Tuesday 15 December 2015

Voter id

ऑनलाइन बनवा कलर व्होटर आयडी कार्ड, फॉलो करा या Simple Steps
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

सौजन्य:- दिव्य मराठी वेब टीम
तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्ही व्होटर आयडी कार्ड (मतदान ओळखपत्र) बनवण्यासाठी पात्र आहात. तुम्ही ऑनलाइन व्होटर आयडी कार्ड बनवू शकतात. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तुम्हाला दिवसेंदिवस फेर्‍या मारण्याची गरज भासणार नाही.

तुम्ही आता घरबसल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने कलर व्होटर आयडी कार्डसाठी अर्ज करू शकतात. एक महिन्यात तुम्हाला तुमचे व्होटर आय कार्ड घरबसल्या मिळेल.

खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरबसल्या व्होटर आयडी कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Step-1. पर्सनल ई-मेल आयडी आवश्यक...

व्होटर आयडी कार्ड बनवण्यासाठी तुमच्याकडे पर्सनल ई-मेल आयडी अथवा मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाला तुमच्याशी संपर्क साधणे सोपे जावे, यासाठी या दोन गोष्‍टी महत्त्वाच्या आहेत. ऑफिशियल मेल आयडी चुकूनही देऊ नये. तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. सगळ्यात आधी निवडणूक आयोगाची वेबसाइट http://eci-citizenservices.nic.in/ ला व्हिजिट करावे. 'न्यू रजिस्ट्रेशन'च्या ऑप्शनवर क्लिक करावे.

Step-2. अर्जात काळजीपूर्वक भरा  विचारलेली माहिती...
'न्यू रजिस्ट्रेशन' ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर एक पेज उघडेल. त्यावर तुम्हाला तुमची सविस्तर माहिती भरावी लागेल. ही माहिती काळजीपूर्वक भरावी. वोटर आयडी कार्ड तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कोणतीही चुकीचे माहिती देऊ नका. चुकीच माहिती दिल्यामुळे निवडणूक आयोग तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील देऊ शकतो.

दुसरी महत्त्वाची गोष्‍ट म्हणजे, स्वत:चा एक कलर पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे. विशेष म्हणजे त्याला व्हाइट बॅकग्राउंड असणे गरजे आहे. फोटो तुम्हाला अर्जासोबत अपलोड करावा लागतो.

Step-3. माहिती बदलूही शकतात...
अर्ज भरल्यानंतर तो सबमिट करावा. अर्ज सबमिट केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत तुम्ही त्यात बदल करू शकतात. काही माहिती आणखी जोडू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही व्होटर आयडी कार्ड अॅप्लिकेशनचा स्टेटस ऑनलाइन चेक करू शकतात.

Step-4. एका महिन्यात मिळेल वोटर आयडी कार्ड
अर्ज सबमिट केल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यावर कार्यवाही करतात. तुम्ही राहात असलेल्या भागातील बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) तुमच्या घरी येऊन तुम्ही अर्जासोबत अपलोड केलेली डॉक्युमेंट्स तपासतात. तसेच डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स कॉपी व्हेरिफाय करण्‍यासाठी सोबत घेऊन जातात. त्यानंतर एक महिन्याच्या आत पोस्टद्वारा तुमच्या घरी व्होटर आयडी कार्ड पोहोच करण्‍यात येते

Step-5. हे डॉक्युमेंट्स करावे लागतील स्कॅन
व्होटर आयडी कार्डसाठी तुम्हाला अॅड्रेस प्रूफ व आय-डी प्रूफ हे वेगवेगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. याशिवाय पासपोर्ट, दहावीचे मार्कशीट, बर्थ सर्टिफिकेट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, बॅंकेचे पासबुक, फोन/पाणी/वीज/गॅसचे बिल, इनकम टॅक्स फॉर्म 16 आदींपैकी कोणतेही दोन डॉक्युमेंट्सच्या स्कॅन कॉपी तुम्हाला अर्ज करताना अपलोड कराव्या लागतील.
@@ DKguru

No comments:

Post a Comment