Sunday 20 December 2015

Charge mahiti

चार्ज  माहिती-

1)सामान व पुस्तकांचे र नं.4  व 5 मधील साहित्य नोंदींप्रमाणे तपासून घ्यावे.

(2) टिकाऊ सामान  जसे टेबल ,खुर्ची, संगणक  , प्रिंटर, लाउडस्पिकर संच,  घंटा,गॅस , रॅक कपाटे , पातेली, ताटे ,ग्लास, लाकडी फळे, टिव्ही,टेप,  रेडिओ,इत्यादी रजि. नुसार चेक करुन  घ्यावे. जे  हजर नाही त्याची नोंद घ्यावी.

(3) शापो योजनेचा  स्टॉक रजि. च्या शिलकीनुसार तपासुन घ्यावा.कमी असल्यास  पुर्तता करवुन घ्यावी.

(4) पुस्तके नावानिशी मोजुन घ्यावीत.शक्यतो पुस्तकाचे आयुष्य तीनएक वर्ष गृहीत  धरुन  बाकी जुनी बाद समजावीत.  व शेवटी  साहित्य  क्रमांक ....ते...पर्यंत चे सामान माझ्या ताब्यात तपासून मिळाले. असे लिहून सही करावी. चार्ज देणाराची पण सही  शेजारी  घ्यावी. जसे...

सही                                        सही                                
चार्ज देणार                  चार्ज घेणार

5) एखादे साहित्य गहाळ झाले असल्यास रजि. वर रकान्यात    संबंधिताचा  शेरा व सही घ्यावी.

6) आर्थिक अभिलेखे- कॅशबुक,पासबुक, व्हाऊचर फाईल,खतावणी,कोरी चेकबुके शेवटच्या शिलकीनुसार ठेवलेला हिशेब प्रत्येक अनुदानानुसार तपासुन घ्यावा. व साहीत्य ताब्यात मिळाल्याचे कॅशबुक वर हिशोबाच्या शेवटी पासबुक , कॅशबुक प्रमाणे ताजी शिल्लक रक्कम अंकी अक्षरी नोंदवावी व दोघांच्या सह्या कराव्यात.

(7) रजिस्टरे नं 1,,4,5  समिती इतिवृत्त,उप .भत्ता,दाखलाफाईल, पालकभेट,  पालक,मातापालक संघ शेरेबुके सालानुसार सर्व निकाल पत्रके व नोंदवह्या  ,यु डायस ,वा.शैक्षणिक. आराखडे फाईल,श्थळप्रत इत्तादी रजिस्टर्स व फाईल्स तपासून खात्री करावी  व यादीत नावापुढे फाईल्स,रजिस्टरे यांची संख्या लिहावी.शेवटी

सही                                        सही                                
चार्ज देणार                  चार्ज घेणार

अशी स्वाक्षरी करावी

(8)शिष्यवृत्ती  वाटप रजि.त्याचे कॅशबुक, चेकबुक शिल्लक तपासून घ्यावे. ताळमेळ योग्य असल्यास  शेवटच्या हिशोबा
शेवटी चार्जर देणार घेणार अशी सही  करावी
             
(9)-आर्थिक व्यवहारात  पासबुके चेकबुके,कॅशबुके प्रत्येक खर्च प्रकारानुसार तपासुन ताब्यात घ्यावीत.सध्या शाळांकडे  (1)सुवर्ण महोत्सवी  आदिवासी शिष्य.
(2) उपस्थीती भत्ता,
(3) सादील,
(4) शाळा सुधार किंवा शैक्षणिक उठाव
,(5) शा पो योजना,
(6) SSA.MPSPस्कुल
(7)   आदिवासी विद्यावेतन (इ.5 ते8)  साठी.
(8) शालार्थ खाते(' पगार) .
(9) गुणवत्ता शिष्यवृत्ती
इत्यादि खाती शाळा प्रकारानुसार  कमी जास्त  असु शकतात. त्याप्रमाणे  पाहून घ्यावीत.
- हि माहीती मी दिल्या घेतल्या चार्ज
अनुभवानुसार दिली आहे. माहितीत फरक पडू शकतो.

((चार्ज सामंजस्याने द्यावा घ्यावा))**  -

No comments:

Post a Comment