Monday 14 December 2015

[12/14, 8:44 PM] ‪+91 75886 20599‬: 🎭मनोरंजक मोफत खेळातुन शिक्षण🎭
➖➖➖➖Ⓜ🅰🅿➖➖➖
🌷 प्रश्नांच्या भेंड्या🌷
साहित्य - आवश्यक नाही.
कृती -  मुलांचे सोईस्कर गट तयार करावे
नियम -
१) आधल्या दिवशी खेळ कोणत्या घटकावर अथवा पाठ्यांश वर आधारित आहे.याची कल्पना द्यावी.
२) एका गटाने दुस-या गटास नियोजीत पाठ्यांशावर प्रश्न विचारावा.
३) प्रतिस्पर्धी गटाने त्याचे उत्तर द्यावे.
४) उत्तर आल्यास प्रतिस्पर्धी गट पुढील गटास प्रश्न विचारणार.
५) उत्तर न आल्यास त्या गटावर एक भेंडी लागेल.
६) त्यानंतर त्या गटाने दुस-या प्रतिस्पर्धी गटास प्रश्न विचारावा.
७) अशा पद्धतीने एक एक गट प्रश्न विचारणार.
८) लागलेल्या भेंड्या दुस-या वेळीच्या खेळात फिटविता येऊ द्याव्यात.
त्यामुळे मुलांच्या कोणत्या प्रश्नावर भेंडी लागली व किती लागल्यात याची माहिती स्मरणात राहते.

➖➖➖➖Ⓜ🅰🅿➖➖➖
[12/14, 10:24 PM] ‪+91 97644 29787‬: शाळा अशी हवी ---
सकाळचा व्यायाम, शाळा परिसरात फेरफटका, पक्षी निरीक्षण, शाळा परिसर स्वच्छता, सर्वांनी मिळून बनवलेली न्याहरी, सामूहिक प्रार्थना गायन, त्यानंतर विविध विषयांचे वर्ग, सोबत बागकाम, कुंभार काम, आवारात लावलेल्या भाजांची निगा, त्यातच पालक, शिक्षक, व मुलांनी मिळून बनवलेले दुपारचे जेवण, संध्याकाळी भरपूर खेळ व व्यायाम पुन्हा अभ्यास, जेवणआणि झोप .

No comments:

Post a Comment