Tuesday 24 May 2016

उपयोगी पडेल असे काही

*सुट्टी मध्ये तंत्रज्ञानाशी करा गट्टी*
   मुलांच्या कॉम्पुटर व मोबाईल वापराचा पालक अनेकदा धसका घेतात. पण नीट वापर केला तर या दोन्ही गोष्टी मार्गदर्शक ठरू शकतात.
    सुट्टी म्हटल्यावर पालकांना सर्वात मोठा प्रश्न पडतो कि मुलांना मोबईल व कॉम्पुटर पासून दूर ठेवायचे कसे? मुलांनी मैदानी खेळ खेळणे गरजेचे असले तरी मोबाइलला, टॅब व इंटरनेट चा वापर करून मुले खऱ्या अर्थाने स्मार्ट होऊ शकतात. यामुळे 'एका दगडात दोन पक्षी' म्हणी प्रमाणे मुलांना मोबाइलला वापरल्याचा आनंद मिळेल व पालकांना मूल नवीन काहीतरी शिकत असल्याचं समाधान. त्यासाठी दिवसभरातील ठराविक वेळ निश्चित करून पालकांच्या उपस्थितीतच मुलांकडून त्याछ वापर होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
  त्या साठी काही विशेष वेबसाइट्स .....
1) artsforkidshub.com
      चित्रकला हा बच्चे कंपनीचा आवडता विषय, बाहेर क्लास ला जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा घरबसल्या चित्रकला शिकण्यासाठी भेट द्या. चित्रकलेसोबतच शिल्पकला, ओरिगामी, हस्तकला यासारख्यामुलांना आवडणाऱ्या गोष्टी ह्या साइट वर आहेत. स्पोर्ट्स कार कार्टून्स कशाप्रकारे काढायचे व त्यांचे printable कलेक्शन ला भेट देण्या साठी artsforkidshub.com ला भेट द्या.

2) mathsisfun.com
शालेय प्रगती मध्ये गणित हा विषय अनेकांसाठी अडथळा ठरत असतो. मात्र लहानपणापासूनच मुलांना गणिताची आवड निर्माण करण्यासाठी हि उन्हाळ्याची सुट्टी वापरता येईल.  त्या साठी mathsisfun.com ला भेट द्या. अंकमोड, बीजगणित, भूमिती, अंतर, प्रमाण, games, dictionary यासारख्या वेगवेगळ्या प्रकारातल्या गणितातील गमती जमती या साईटवर मुलांना खिळवून ठेवतील. याशिवाय इयत्तेवर आधारित गणिते वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगितली आहेत.त्यामुळे सुट्टीत गणिताशी बट्टी करण्यासाठी अवश्य भेट द्या

3) http://indian.madscience.org
   जगप्रसिद्ध 'नासा' या संस्थेशी संलग्न असलेली मॅड सायन्स हि संस्था मागील 30 वर्षापासून विज्ञानाची गोडी लागावी म्हणून नुसत्या पुस्तकी ज्ञानाऐवजी मुलांना प्रत्येक प्रयोग स्वतः हाताळायला देण्याची मॅड सायन्स ची कन्सेप्ट आहे. स्वतः प्रयोग केल्याने मुलांना सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतातच त्याशिवाय त्यांना कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टीही शिकाव्याश्या वाटतात, असे पुण्यात मॅड सायन्सचे वर्ग चालवणारे प्रणव चौबे सांगतात.
  alchemist education प्रकारात मुलांना वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे विज्ञान पुस्तकातून नव्हे तर अनुभवातून शिकतात, असे संदीप जोशींच म्हणणं आहे.मुंबई, पुणे, बंगळूर प्रमाणे अनेक शहरात मॅड सायन्सचे 1ली ते 10 वि च्या मुलांसाठी वर्ग भरवण्यात येतात. वरील साईट ला भेट देऊन अधिक माहिती घ्या.

4) स्मार्ट किट :-
http://www.smart-kit.com या वेबसाईट वर मुलांसाठी, वेगवेगळे लॉजिक वापरून सोडवायची अनेक लहान मोठी वेगवेगळ्या प्रकारची कोडी व खेळ उपलब्ध आहेत. हे खेळ logical thinking, गणित, शब्दांबद्दलचे ज्ञान वाढवणारे, बुद्धीला चालना देणारे आहेत.

5) द कीड शुड सी दिस
  http://thekidshouldseethis.com yaa वेबसाईट वर अनेक प्राणी, सुपर हिरो, व्यक्ती, झाडे ह्या प्रकारच्या विषयावर उत्तम आणि दर्जेदार माहिती असणारे video उपलब्ध आहेत

6) ओरिगामी क्लब
     आपल्या बोटांचा वापर करून पेपर मुडपून त्या पासून सुंदर कलाकृती निर्माण करणारी जपानी कला म्हणजे ओरिगामी, सध्या फारच लोकप्रिय आहे. घरच्या घरी ओरिगामी शिकण्यासाठी एक छान पर्याय म्हणजे http://en.origami-club.com हि वेबसाईट.

7) मोकॉमी
   मजा, शिक्षण आणि मोकोमॉग या रिण भागांमध्ये विभागण्यात आलेली http://mocomi.com हि साईट. कला, क्राफ्टस, गेम्स, गोष्टी, चित्रकला, इतिहास, भूगोल, यांसारखे विषय पहिल्या डॉन भागात आहेत तर मोकोमॉग भागात ऑनलाइन मासिके व पुस्तके आहेत.

8) वंडरपोलीस
   अहं मूल खूप चौकस असतात.
हे असंच का?
ते तसं का नाही?
असे बरेच प्रश्न विचारून आपल्याला भंडावून सोडतात. http://wonderpolis.org वर मुलांबरोबर मोठ्यांनाही अनेक प्रश्नांची उतराई आकर्षक पद्धतीने मिळतील. users च्या वयानुसार, विषयानुसार वर्गीकरण करता येते.

source: india times