Sunday 20 December 2015

Dhyanrchnavad

⭕ ज्ञानरचनावाद⭕

⚪"पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद  म्हणतात  "⚪

🔴वैशिष्ट्ये  :--
1⃣घोकंपट्टीपासून सुटका :- आकलन करून समजुन अभ्यास करता येतो .
2⃣शाळेबाहेरचे जग आणि  शाळेतील शिकणे यांची सांगड घालता येते
3⃣अध्ययन कौशल्यांचा विकास :- श्रवण  , भाषण, वाचन , लेखन ,संभाषण , अभिव्यक्ति या कौशल्याचा विकास करणे सोपे होत.े
4⃣नविन माहिती पूर्वज्ञानाशी जुळणारी असेल तर पूर्वीच्या ज्ञानात भर पड़ते .
5⃣आंतरक्रियेमुळे ज्ञाननिर्मितीला फायदा होतो.

📕📙 पाठ शिकवताना खालील कृती अवश्य करून घ्याव्यात....
1⃣ पाठ एक दिवस आधी वाचुन येण्यास सांगा
2⃣पाठ मधील चित्र दाखवून मुलांचे गट👭👬 करून चर्चा घडवून आणा.
3⃣झालेली चर्चा प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 सांगण्याची संधी दया .
4⃣गटात चित्रावर आधारित पाच सहा ओळी माहिती लिहिण्यास 📝 सांगा
5⃣प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 माहिती वाचण्यास सांगा
6⃣पाठाचा आशय स्पष्ट करून सांगा   . चर्चा घडवून आणा .
7⃣योग्य तेथे साहित्याचा💽💻📱📻📚🎶 वापर करा .
8⃣नविन शब्दाचा वाक्यात उपयोग करून घ्या
9⃣संवादात्मक पाठ मुलांना पात्र देवून नाटयीकरणाद्वारे सादर करून घ्या .
1⃣0⃣ कविता साभिनय💃 👯सादर करून घ्या .

↪आपल्या भूमिकेत थोडा बदल करून
👉शिकणे 👈ही क्रिया अधिक मनोरंजक करू या .
आपण कमी बोलून मुलाना बोलते करून त्यांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दया .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment