Tuesday 22 March 2016

🙏🙏🙏🙏joshi. m.b🙏🙏🙏🙏
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
      
          💐नगर पॅटर्न💐

🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
🎯कॉम्प्युटरच्या या काही ट्रिक्स आपल्या करतील पॉवर युजर🎯

मुंबई : कॉम्प्युटर आपल्या जीवनातील एक हिस्सा झालाय. संगणकावर काम करताना काही निरुपयोगी गोष्टी आपला वेळ खातात. तसेच कामात बाधा आणतात. त्यामुळे तुम्ही या काही ट्रिक्स आपल्यापॉवर युजर करतील.

सध्या कॉम्प्युटरचा वापर जवळपास प्रत्येक घरात करण्यात येत आहे. मात्र, काहींना आपला संगणक कसा हाताळायचा याची माहिती नसते. मात्र, या ट्रिक्स वापरल्यात तर तुम्ही स्मार्ट व्हाल आणि तुमचा वेळ वाचेल.

अधिक वाचा
कीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो
पाहा काय आहेत या ट्रिक्स :
१. तुम्ही दोन विंडोजचा वापर करणार असाल तर आपल्या किबोर्डवर विंडो बटन आहे. त्या बटनाला राईट आणि लेफ्टे अॅरोबरोबर प्रेस करा. दोन्ही विंडो कॉर्नरला एकत्र येतील.

२. काम करताना चुकून कॉम्प्युटर बंद झाला तर
ctrl+shift+T टाईप करा. आपला टॅब ओपन होईल.

३. स्पेस बारची कमाल. ज्यावेळी कोणत्याही ब्राऊझरमध्ये ब्राऊझिंग करत असाल तर खाली जाण्यासाठी स्पेस बारचा उपयोग करा आणि वरती जाण्यासाठी Shift की बरोबर स्पेस बारला प्रेस करा.

अधिक वाचा
किबोर्ड... फोल्ड करा... आणि सहजच कुठेही कॅरी करा!
४. तुम्ही एखादी खासगी गोष्टी सर्च करीत असाल आणि तुमची URL आपल्या कॉम्प्युटरच्या हिस्ट्रीमध्ये नको असेल तर तुम्ही ctrl+shift+N टाईप करा. असं केल्यानंतर तुमच्या हिस्ट्रीमध्ये काहीही सेव्ह होणार नाही.

५. आपल्या कॉम्प्युटरची बॅटरी सेव्ह करण्यासाठी तुम्ही बॅटरी सेव्हिंग मोड ऑन करु शकता. तसेच आपल्या संगणकाचा डिस्प्ले डिम करु शकता. त्यामुळे बॅटरी सेव्ह होते.
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
🎯अँड्रॉईड फोनमध्ये या ५ गोष्टी करू नका🎯

मुंबई : अँड्रॉईड फोन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी काय केले पाहिजे, याची माहिती करून घेणे जरूरीचे आहे. यासाठी या खालील पाच गोष्टी महत्वाच्या आहेत.

ज्या अॅपविषयी आपण ऐकलं नसेल, असे अॅप डाऊनलोड करू नका. तुम्हाला जास्तच जास्त कामाचे असतील तेच डाऊनलोड करा.

सुरूवातीलाच बॅटरी बुस्टर अॅपचा वापर करण्यापासून दूर रहा, त्याचा कोणताही फायदा होत नाही.

फोनच्या कॉन्टॅक्टसमध्ये कॉल सेव्ह करू नका, त्याचा बॅकअप बनवा, गुगल अकाऊंटला सर्व कॉन्टॅक्टस बॅकअप बनवू शकतात.

बॅटरीचं लाईफ वाढण्यासाठी नको असलेले अॅप लगेच बंद करा.

फोन जर तापत असेल तर किती अॅप सुरू आहेत ते पाहा आणि लगेच बंद करा.
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲

🎯चॅट गुप्त ठेवण्यासाठी, व्हॉटसअॅप लॉक करा🎯

मुंबई : व्हॉटस अॅप मॅसेजिंग अॅप जो सर्वाधिक वापरला जातो, यात मित्रांचा समूह अथवा खासगी चॅटिंगही होते. आपलं खासगी बोलणं गोपनीय ठेवण्यासाठी तु्म्ही व्हॉटस अॅप लॉक करू शकतात.

व्हॉटस अॅप लॉक करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जाऊन कीप प्रायव्हसी अॅप इन्स्टॉल करा.

हा अॅप तुमच्याकडून चार अंकी नंबर मागेल, तो तुमचा पासवर्ड असेल, तो कन्फर्म करा.

तुम्ही ठरवलेला पासवर्ड पिन व्हॉटस अॅप प्रोटेक्ट करेल.

आता जो कुणी व्हॉटसअॅप ओपन करण्याचा प्रयत्न करेल, त्याला हा पिन टाकावा लागेल.

चुकीचा पिन टाकला तर त्या व्यक्तीचा फोटो फोनमध्ये सेव्ह होईल.
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲
🎯पाण्यात पडलेला मोबाईल वाळवण्याच्या पाच टिप्स🎯

मुंबई : अनेकदा मोबाईल फोन पाण्यात पडल्यावर खराब होतो. त्यामुळे बरेच जण आपापल्या पद्धतीने फोन कोरडा करण्याच्या पद्धती अवलंबतात. काही जण फोन ओव्हनमध्ये वाळवतात तर काही हीटरवर फोन ठेवतात. पण या पद्धतीने तुमचा फोन खराब होऊ शकतो.
जर तुमचा फोन पावसात भिजला असेल किंवा पाण्यात पडला तर काळजी करु नका. भिजलेला मोबाईल फोन वाळवण्याच्या पाच सोप्या टिप्स देत आहोत, जेणेकरुन तुमचा फोन खराब होणार नाही.
1. जर मोबाईल फोन भिजला असेल तर तातडीने त्याची बॅटरी काढून फोन स्विच ऑफ करा. फोन ऑफ केल्यानंतर सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.
2. फोनच्या अक्ससरीज वेगळं केल्यानंतर फोनचे इतर पार्ट्स वाळवणं गरजेचं आहे. यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. याशिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो.

3. भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांड सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवसा ठेवावा.

4. तांदळाच्या भांड्यात मोबाईल ठेवायचा नसेल तर सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता. हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

5. मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.
हे करणं टाळा:

ओला मोबाईल कधीही हेअर ड्रायरने वाळवू नये. ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
Joshi.m.b
ता.शेवगाव जि.अहमदनगर
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲

No comments:

Post a Comment