Friday 16 October 2015

Big reality

एक पानठेल्या वाला गुरुजींना नेहमी नेहमी टोमने मारायच की
"तुम्हाला काम कमी आहे आणि पगार जास्त".
एक दिवस गुरुजीची सटकली
गुरूजी म्हणाले - एक पान किती रूपयाला आहे? पानठेल्यावाला म्हणाला 10 रु. चे.
ठीक आहे याच पानाचे मी तुला 20 रु. देतो. फक्त काही नियम पाळावे लागतील.

हे घे रजिस्टर, यात प्रत्येक पानाची माहिती लिहायची.
उदा : हे पान कोणत्या झाडाचे आहे, ते झाड़ कोणत्या शेतात आहे, त्याचा पत्ता, केंव्हा तोडले त्याची तारीख, तुझ्या दुकानात आणल्याची तारीख, या पानात जे जे टाकले त्या कात, चुना, सुपारी, ई. पदार्थांची माहिती मला लिखित स्वरुपात दे, त्यावर तुझी सही कर, माझी सही घे, माझा शेरा घे, पान खाण्या पूर्वीचे माझे वर्णन पान खाल्ल्या नंतर ची माझी स्थीती ही सर्व माहिती यात लिही आणि नंतर ती मी सांगतो त्या वेब साइट वर अपलोड कर ....

इतके सांगेपर्यंत तो पानवाला चक्कर येऊन बेहोश पडला होता.

गुरूजी सोबत पंगा घ्यायचा नाही.

No comments:

Post a Comment