Tuesday, 22 March 2016

🙏🙏🙏🙏joshi. m.b🙏🙏🙏🙏
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
      
          💐नगर पॅटर्न💐

🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
🎯कॉम्प्युटरच्या या काही ट्रिक्स आपल्या करतील पॉवर युजर🎯

मुंबई : कॉम्प्युटर आपल्या जीवनातील एक हिस्सा झालाय. संगणकावर काम करताना काही निरुपयोगी गोष्टी आपला वेळ खातात. तसेच कामात बाधा आणतात. त्यामुळे तुम्ही या काही ट्रिक्स आपल्यापॉवर युजर करतील.

सध्या कॉम्प्युटरचा वापर जवळपास प्रत्येक घरात करण्यात येत आहे. मात्र, काहींना आपला संगणक कसा हाताळायचा याची माहिती नसते. मात्र, या ट्रिक्स वापरल्यात तर तुम्ही स्मार्ट व्हाल आणि तुमचा वेळ वाचेल.

अधिक वाचा
कीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो
पाहा काय आहेत या ट्रिक्स :
१. तुम्ही दोन विंडोजचा वापर करणार असाल तर आपल्या किबोर्डवर विंडो बटन आहे. त्या बटनाला राईट आणि लेफ्टे अॅरोबरोबर प्रेस करा. दोन्ही विंडो कॉर्नरला एकत्र येतील.

२. काम करताना चुकून कॉम्प्युटर बंद झाला तर
ctrl+shift+T टाईप करा. आपला टॅब ओपन होईल.

३. स्पेस बारची कमाल. ज्यावेळी कोणत्याही ब्राऊझरमध्ये ब्राऊझिंग करत असाल तर खाली जाण्यासाठी स्पेस बारचा उपयोग करा आणि वरती जाण्यासाठी Shift की बरोबर स्पेस बारला प्रेस करा.

अधिक वाचा
किबोर्ड... फोल्ड करा... आणि सहजच कुठेही कॅरी करा!
४. तुम्ही एखादी खासगी गोष्टी सर्च करीत असाल आणि तुमची URL आपल्या कॉम्प्युटरच्या हिस्ट्रीमध्ये नको असेल तर तुम्ही ctrl+shift+N टाईप करा. असं केल्यानंतर तुमच्या हिस्ट्रीमध्ये काहीही सेव्ह होणार नाही.

५. आपल्या कॉम्प्युटरची बॅटरी सेव्ह करण्यासाठी तुम्ही बॅटरी सेव्हिंग मोड ऑन करु शकता. तसेच आपल्या संगणकाचा डिस्प्ले डिम करु शकता. त्यामुळे बॅटरी सेव्ह होते.
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
🎯अँड्रॉईड फोनमध्ये या ५ गोष्टी करू नका🎯

मुंबई : अँड्रॉईड फोन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी काय केले पाहिजे, याची माहिती करून घेणे जरूरीचे आहे. यासाठी या खालील पाच गोष्टी महत्वाच्या आहेत.

ज्या अॅपविषयी आपण ऐकलं नसेल, असे अॅप डाऊनलोड करू नका. तुम्हाला जास्तच जास्त कामाचे असतील तेच डाऊनलोड करा.

सुरूवातीलाच बॅटरी बुस्टर अॅपचा वापर करण्यापासून दूर रहा, त्याचा कोणताही फायदा होत नाही.

फोनच्या कॉन्टॅक्टसमध्ये कॉल सेव्ह करू नका, त्याचा बॅकअप बनवा, गुगल अकाऊंटला सर्व कॉन्टॅक्टस बॅकअप बनवू शकतात.

बॅटरीचं लाईफ वाढण्यासाठी नको असलेले अॅप लगेच बंद करा.

फोन जर तापत असेल तर किती अॅप सुरू आहेत ते पाहा आणि लगेच बंद करा.
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲

🎯चॅट गुप्त ठेवण्यासाठी, व्हॉटसअॅप लॉक करा🎯

मुंबई : व्हॉटस अॅप मॅसेजिंग अॅप जो सर्वाधिक वापरला जातो, यात मित्रांचा समूह अथवा खासगी चॅटिंगही होते. आपलं खासगी बोलणं गोपनीय ठेवण्यासाठी तु्म्ही व्हॉटस अॅप लॉक करू शकतात.

व्हॉटस अॅप लॉक करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जाऊन कीप प्रायव्हसी अॅप इन्स्टॉल करा.

हा अॅप तुमच्याकडून चार अंकी नंबर मागेल, तो तुमचा पासवर्ड असेल, तो कन्फर्म करा.

तुम्ही ठरवलेला पासवर्ड पिन व्हॉटस अॅप प्रोटेक्ट करेल.

आता जो कुणी व्हॉटसअॅप ओपन करण्याचा प्रयत्न करेल, त्याला हा पिन टाकावा लागेल.

चुकीचा पिन टाकला तर त्या व्यक्तीचा फोटो फोनमध्ये सेव्ह होईल.
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲
🎯पाण्यात पडलेला मोबाईल वाळवण्याच्या पाच टिप्स🎯

मुंबई : अनेकदा मोबाईल फोन पाण्यात पडल्यावर खराब होतो. त्यामुळे बरेच जण आपापल्या पद्धतीने फोन कोरडा करण्याच्या पद्धती अवलंबतात. काही जण फोन ओव्हनमध्ये वाळवतात तर काही हीटरवर फोन ठेवतात. पण या पद्धतीने तुमचा फोन खराब होऊ शकतो.
जर तुमचा फोन पावसात भिजला असेल किंवा पाण्यात पडला तर काळजी करु नका. भिजलेला मोबाईल फोन वाळवण्याच्या पाच सोप्या टिप्स देत आहोत, जेणेकरुन तुमचा फोन खराब होणार नाही.
1. जर मोबाईल फोन भिजला असेल तर तातडीने त्याची बॅटरी काढून फोन स्विच ऑफ करा. फोन ऑफ केल्यानंतर सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.
2. फोनच्या अक्ससरीज वेगळं केल्यानंतर फोनचे इतर पार्ट्स वाळवणं गरजेचं आहे. यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. याशिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो.

3. भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांड सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवसा ठेवावा.

4. तांदळाच्या भांड्यात मोबाईल ठेवायचा नसेल तर सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता. हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

5. मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.
हे करणं टाळा:

ओला मोबाईल कधीही हेअर ड्रायरने वाळवू नये. ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
Joshi.m.b
ता.शेवगाव जि.अहमदनगर
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲

Friday, 18 March 2016

सवांनी
वाचावीत अशी संग्राह्य पुस्तके

०१.) एक होता कारव्हर = वीणा गवाणकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) ययाती = वि. स. खांडेकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युनजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८७.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८८.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
८९.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९०.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९१.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९२.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९३.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९४.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९५.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९६.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९७.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९८.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
९९.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे
१००.) चकित करणारे गणिते = श्याम मराठे
१०१.) अब्यकस = रवींद्र पुरी
१०२.) तंत्र गणिताचे भाग – १ = रवींद्र पुरी
१०३.) तंत्र गणिताचे भाग -२ = रवींद्र पुरी
१०४.) बहुविध कोडी = रमेश काणकोणकर
१०५.) गणितातील कयास खरे व चुकलेले = डॉ. व.ग. टिकेकर
१०६.) गमतीदार विज्ञान = निरंजन घाटे

Monday, 14 March 2016

पसायदान अर्थ

पसायदानाचा अर्थ…
प सा य दा न

आता विश्वात्मके देवे |
येणे वागज्ञे तोषावे |
तोषोनि मज द्यावे पसायदान हे |

आता म्हणजे ज्ञानेश्वरी लेखन पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर विश्वात्मक असा जो सर्व धर्मातीत देव त्याला विनंती करत आहेत कि त्याने ह्या वांग्मय यज्ञाने प्रसन्ना व्हावे आणि मला या प्रसादाचे दान द्यावे. सर्व विश्व हेच माझे घर आहे, नव्हे आपणच सर्व विश्व जो बनला आहे अशा अत्मानुभूतीने संपन्न आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथाना त्यांनी विश्वात्मक हि उपाधी दिली आहे. यज्ञ म्हणजे निष्काम भावाने केलेले कर्म अशी व्याख्या गीतेने केली आहे. गीतेवरील टीका हा वांग्मय यज्ञ आहे असे ते म्हणतात. या यज्ञाने प्रसन्न होऊन गुरुनी प्रसाद द्यावा असे ते म्हणतात…

जे खळांची व्यंकटी सांडो |
तया सत्कर्मी रती वाढो |
भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे |

जे चा संबंध मागच्या ओवीशी आहे. मला या प्रसादाचे दान द्या कि, असा त्याचा अन्वय लावून येथून पुढे कोणत्या गोष्टी मिळाव्यात त्याचा उल्लेख आहे…
खल म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण सुटावे असे मागणे मागितले आहे. त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न होवो असे झाले म्हणजे कोणाशी त्याचे शत्रुत्व राहणार नाही. सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीचा व्यवहार होईल. मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वतःच जबाबदार आहे, त्याने स्वतःच स्वताचा उध्दार करायचा आहे असे भगवंत येथे सुचवतात…

दुरितांचे तिमिर जावो |
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो |
जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात|

दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार, पापरूपी अंधाराचा नाश होवो. सगळ्या विश्वाने स्वधर्मरूप सूर्याच्या प्रकाशात पाहावे मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल.
पाप म्हणजे काय?
सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या कमी-अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. रज, तम च्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रू बलवान होतात, मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निष्कामवृत्तीने कर्माचरण. हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवतधर्माचे सारही हेच आहे. स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वाना पाहिजे ते मिळेल असे ज्ञानेश्वर म्हणतात.

वर्षत सकल मंगली |
ईश्वर निष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडली | भेटतु या भूता  |

या पृथ्वीतलावर संपूर्ण मांगल्याचा अखंड वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा समुदाय सर्व प्राण्यांना भेटो. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचे समाज अनुकरण करतो. त्याच्या वागण्यातून सामान्यांना धर्म कळतो. त्याच्या हृदयातील ज्ञानदिपाच्या प्रकाशात योग्य मार्ग दिसतो. ईश्वरनिष्ठ आपल्या आत्मज्ञानाने पूर्णतया संसाराकडे पाठ फिरवून मुक्त झालेला असतो, पण समाज हिताकरता त्याने कर्मत्याग न करता लोकसंग्रह करीत समाजाचा एक घटक म्हणून जगले पाहिजे. याकरता श्रीकृष्णांनी स्वत:चे उदाहरण दिले आहे. गीतेची हीच शिकवण आहे समाजातील सर्वांचेच आचरण शुध्द झाले पाहिजे, तरच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे मोठा समूह तयार होईल. हे श्री ज्ञानदेवांचे मागणे आहे.

चला कल्पतरूंचे आरव |
चेतना चिंतामणीचे गाव |
बोलते जे अर्णव | पीयूषांचे |

ईश्वर निष्ठांचे वर्णन करण्यासाठी येथे ज्ञानेश्वरांनी तीन काव्यमय उपमा दिल्या आहेत. जे चालणारे कल्पतरूंचे बगीचे आहेत सजीव अशा चिंतामणीचे गाव आहेत अमृताचा बोलणारा समुद्र आहेत. चल म्हणजे चालणारा. कल्पतरू म्हणजे जे मागाल ते देणारे झाड. पण त्याच्याकडे आपल्याला जावे लागते, तर सज्जन मात्र कल्पतरू तर आहेतच, शिवाय तेच स्वतः तुमच्याकडे येतात. शिवाय ते कल्पतरू प्रमाणे एकच नाहीत, तर त्यांची बागच आहे. चिंतामणी म्हणजे जे चिंताल ते देणारा दगड. संतही जे चिंताल ते देतात म्हणून ते चिंतामणी आहेत, शिवाय ते सजीव असल्याने देताना योग्य व अयोग्य याचा विवेक बाळगतात, आणि चिंतामणी प्रमाणे ते दुर्मिळ नाहीत, तर त्यांचे समूह आहेत.
अमृताचा एक थेंब अमरत्व देतो, संत हे अमृताचा बोलणारा सागर आहेत म्हणून ते साऱ्या समाजाला अमर करू शकतात.

चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन |
तेसर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु |

येथे संतांची तुलना चंद्र आणि सूर्याशी केली आहे . जे डाग नसलेले चंद्र आहेत, उष्णता नसलेले सूर्य आहेत, असे सज्जन सर्वांचे सोयरे, नातेवाईक होवोत अशी प्रार्थना ते करतात. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. चंद्र चांदण्याचा वर्षाव करून अंधार नाहीसा करतो, तसेच संत स्वधर्म आचरणाने पापाचा अंधार नाहीसा करून मंगलतेच्या चांदण्याचा वर्षाव करतात, चंद्रावर डाग आहेत, पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो, पण तो दाहक आहे, संत ज्ञानाचा प्रकाश देतात पण ते दाहक नाहीत. अशाप्रकारे गीतेतील तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप असे जे संत, त्यांचे श्रेष्ठत्व श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात.

किंबहुना सर्वसुखी |
पूर्ण होऊनी तिन्ही लोकी |
भजिजो आदिपुरुषी | अखंडित |

स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकातील सर्वांनी सर्व प्रकारे सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची अखंडित भक्ती करावी अशी प्रार्थना ज्ञानेश्वर करतात. दुष्ट पुरुषाची दुर्बुद्धी नाहीशी होऊन त्याला सत्कर्मात रती उत्पन्न होईल. पापाचा अंधार नाहीसा होऊन स्वधर्माचा सूर्योदय होईल. ईश्वर निष्ठांचे समूह मांगल्याचा वर्षाव करतील. चारित्र्यवान पुरुष सर्व प्राणिमात्राचे सोयरे होतील. असे आदर्श समाजचित्र सुखी जीवनाचा मार्ग आहे. समाजाचे सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय सर्व सुखी होणार नाहीत. आदिपुरुष म्हणजे परमात्मा. जो हे जाणतो कि परमात्माचे सर्वत्र अस्तित्व आहे, तो स्वतः त्याच्याशी एकरूप होतो. भक्त आणि भगवंत यात भेद उरत नाही. या आदिपुरुषाची पूजा करावी स्वकर्म -कुसुमानि. हेच त्याचे भजन होय.

आणि ग्रंथोपजीविये | विशेषी लोकीं इये |
दृष्ठादृष्ठविजयें | होआवें जी |

आणि विशेषतः या जगात हा ग्रंथ ज्यांचे जगण्याचे साधन, आधार झाला आहे, त्यांना दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही विजय मिळोत. गीतेत कर्मयोग आणि भक्ती हे परमात्म्यापर्यंत सर्वाना पोहोचण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्यासाठी साधनेची, ज्ञान किंवा योग मार्गातील तपस्येची गरज नाही. आपले सामान्य जीवन जगताना गीतेने सांगितलेल्या सत्वगुण युक्त मार्गाने चालले आणि परमात्म्याचे सतत नामस्मरण केले, तर या जीवनात म्हणजे दृष्ठ आणि मरणोत्तर म्हणजे अदृष्ट असे दोन्ही विजय लाभतील असे श्री ज्ञानेश्वर म्हणतात. जीवनात आणि जीवनोत्तर नैतिकतेने विजयी होणे ह्याला भारतीय तत्वज्ञान जे महत्व देते तेच त्याचे वेगळेपण आहे.

तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो |
हा होईल दान पसावो |
येणे वरे ज्ञान देओ | सुखिया झाला |

तेंव्हा विश्वाचे राजे म्हणले “या प्रसादाचे दान मिळेल.” या वरामुळे ज्ञानेश्वरांना आनंद झाला. श्री निवृत्तीनाथ गुरु यांना येथे विश्वाचा राजा म्हणून संबोधिले आहे. ते म्हणाले कि ही ग्रंथरचना करताना ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला तो सफल होवो. या मराठी भाषेच्या नगरी ब्रह्मविद्या इतकी सर्वां पर्यंत पोहोचो की जग सुखमय होवो. श्रोत्यांनी मन एकाग्र करून या ग्रंथाचे श्रवण केले आणि त्याप्रमाणे आचरण केले तर ते सुखी होतील हे ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा पूर्ण होवो. अशा रीतीने या वाकयज्ञाचा उद्देश पूर्ण झाला म्हणून ज्ञानेश्वरांना आनंद झाला.

इदं न मम

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

Friday, 19 February 2016

PC फॉर्मेट कसा करावा ?

आपला PC/LAPTOP सारखा प्रॉब्लम येत असेल तर फॉर्मेट करावा लागतो.तो कसा करावा यासाठी आपण खाली दिलेल्या पद्धतीने विंडोज इंस्टॉल करू शकतो.
१.डाटा बॅकअप : c ड्राइव मधे असलेला डेटा वीडियो,इमेजेस pendrive मधे बैकअप करून घ्या.
    

२. CD किंवा DVD किंवा आपण आपल्या CD / DVD चाकिंवा USB प्राधान्य प्रथम बूट साधन ड्राइव्ह करणे आवश्यक आहे USB ड्राइव्ह पासून बूट करा. आपल्या संगणकावरनिर्माते लोगो स्क्रीन दिसेल तेव्हा सेट BIOS मध्ये प्रवेश सुरूअसताना, हे करण्यासाठी. उत्पादक लोगो स्क्रीन दिसते तेव्हा आपल्या संगणकावर सुरू असताना हे सेटिंग पृष्ठ दाबा F2 दाबा, F10, F12 किंवा डेली की मध्ये प्रविष्ट करा. (विशेषतःकी स्क्रीन खाली प्रदर्शित केले जाईल

 ३ आता, BIOS मेनू मध्ये बूट मेन्यू पर्याय जा. आणि प्रथम बूटसाधन म्हणून सीडी ड्राइव्ह करून बूट साधन क्रम बदलू.तुमची प्रणाली सुरू असताना या सीडी ऐवजी हार्ड डिस्कपासून बूट करेल. आता ठराविक दिवशी (F10 दाबून आणि यामे प्रणाली प्रणाली बदलते) आपल्या आपण केलेले बदलआणि बाहेर पडा जतन करा आपल्या
संगणक रीस्टार्ट होईल.
टीप: आपण USB ड्राइव्ह पासून प्रतिष्ठापन करत असल्यास, नंतर आपण प्रथम बूट साधन प्राधान्य काढण्याची स्टोरेज सेटआहे

४    1) BIOS सेटअप पूर्ण केल्यानंतर बूट डिस्क अंतर्भूत करा व संगणक पुन्हा सुरू करा. आणि ते तुम्हाला कळत सुरूअसताना आता आपण एक संदेश दिसेल "सीडी पासून बूट करण्यासाठी कुठलिही कि दाबा ..." म्हणून कीबोर्ड आणि Windows 7 सेटअप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेकोणत्याही कळ दाबा.


५  आता आपण Windows फाइल लोड केले जाईल पाहू शकता. पूर्ण केल्यानंतर विंडोज 7 लोगो दिसेल. काहीही कॉपी किंवा अजून तुमच्या संगणकावर बदलण्यात आले आहे. आणिडेटा नंतर हटवले जाईल

६  या चरणात पसंती निवड करावी लागेल. येथे आपण पुष्टी करा आणि आपली भाषा, तुमचे वेळ क्षेत्र आणि चलन स्वरूप,आणि कीबोर्ड-इनपुट पद्धत (यूएस) निर्देशीत करण्यासाठी सूचित केले जाईल. अचूक पर्याय निवडल्यावर तुमच्या प्रणालीसाठी पुढे क्लिक करा

 ७   आता वर क्लिक करा आता स्थापित करा. आपण पुन्हा स्थापित Windows द्वारे तुमची प्रणाली दुरुस्ती जरी दुरुस्तीक्लिक करू नका. एकदा सेटअप फक्त एक मिनिटे वाटआपोआप पुढे जाईल, क्लिक

८  पुढील आणि क्लिक करा: आता ( करार आणि अटी वाचून'मी परवाना अटी स्वीकारत आहे' वर क्लिक करा

९   आता एक पडदा विचारून दिसेल 'आपण कोणत्याही प्रकारचे प्रतिष्ठापन करू इच्छिता?' स्थापित सानुकूल निवडा.
आपण विस्टा सुधारणा करू इच्छित असेल तर अपग्रेड वरक्लिक करा. विंडोज XP मध्ये 7 पासून सुधारणा शक्य नाही

 १०     एक नवीन विंडो विचारून दिसेल 'आपण Windowsस्थापित करू इच्छिता कोठे आहे?' आता "(प्रगत) ड्राइव्ह पर्याय." वर क्लिक करा हटवू, स्वरूप किंवा विभाजनेव्यवस्थापित करू शकता येथे क्लिक करा.
     आपल्या विद्यमान कार्यकारी प्रणाली विभाजन नीवडा.
आपल्या हार्ड डिस्क अनेक ड्राइव्ह असेल तर  नंतर खात्री कराआणि योग्य (साधारणपणे तो नेहमी आहे "क [विभाजन 1]"ड्राइव्ह) निवडा. विभाजन या विशिष्ट विभाजन अंतर्गतसर्वकाही हटवू स्वरुपण कारण.
आता ड्राइव्ह वर क्लिक करा आणि स्वरूप वर क्लिक करा.

 ११ या स्वरूपन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला सूचित केले जाईल.
फार प्रक्रिया पुढे क्लिक करा पूर्ण केल्यानंतर. या Windows प्रतिष्ठापन सुरू राहील. आणि ही प्रक्रिया तुमची प्रणाली गती अवलंबून 1 तास 30 मि लागू शकतो.

 १२  प्रतिष्ठापन पूर्ण केल्यानंतर आपल्या संगणक पुन्हा सुरूकरण्यात येणार आहे.



१३    ... सुरू ठेवण्यासाठी कोणतीही की 'सुरू प्रेस केल्यानंतर"पुन्हा प्रदर्शित केला जाईल. पण आपण आधीच केले कारणनाही. काही दाबू नका.
  आता फक्त एक मिनिटे वाट आणि आपल्या PC बूट सुरूआणि फक्त काही अधिक मि आत संपूर्ण प्रतिष्ठापन प्रक्रिया पूर्ण होईल.

 १४   शेवटी प्रक्रिया पूर्ण

 १५   आता आपले वापरकर्तानाव प्रविष्ट करा (हे आपल्या Windows नाव असेल)

 



१६    आणि Windows पासवर्ड विचारेल. हे वैकल्पिक आहे.

 १७  आता पुढे क्लिक करा व आपल्या Windows 7 उत्पाद कळ टाइप करा. आणि "मी ऑनलाईन करतेवेळी आपोआपविंडोज सक्रिय" पर्याय तपासा. हे सत्यापित करा म्हणजे आपण इंटरनेट कनेक्ट आपल्या Windows पुढील वेळीसक्रिय करणार नाही

 आता विंडोज अपडेट पर्याय निवडा. सुरक्षितपणे तुमची प्रणाली चालवण्यासाठी आणि स्थिरता तो आपण प्रथम दोनपर्यायांपैकी एक निवडा शिफारस केली जाते. प्रथम शोधआणि इंटरनेट वरून स्वयंचलितपणे अद्यतने स्थापित करेल.महत्वाचे सुधारणा उपलब्ध आहेत तेव्हा दुसरा पर्यायआपल्याला सूचित करेल.


पुढील विंडो मध्ये तारीख आणि वेळ सेट.

 पुढील निवडा संजाळ प्राधान्यता. साधारणपणे वापरकर्त्यांची सर्वात मुख्यपृष्ठ नेटवर्क निवडा. आपल्या नेटवर्क सार्वजनिक ठिकाणी वापरले जात आहे, तर सार्वजनिक नेटवर्क निवडा

 शेवटी! सर्व काही केले. अंतिम लोड केल्यानंतर विंडोज सुरू होईल. आणि आता आपण आपल्या PC अन्वेषण करू शकता.