Wednesday, 23 December 2015

Praklp yadi

पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -

भाषा -:
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.   
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.

गणित -:
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

सामान्य विज्ञान -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.

इतिहास व ना.शास्त्र  -:
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

भूगोल -:
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏

Sunday, 20 December 2015

Charge mahiti

चार्ज  माहिती-

1)सामान व पुस्तकांचे र नं.4  व 5 मधील साहित्य नोंदींप्रमाणे तपासून घ्यावे.

(2) टिकाऊ सामान  जसे टेबल ,खुर्ची, संगणक  , प्रिंटर, लाउडस्पिकर संच,  घंटा,गॅस , रॅक कपाटे , पातेली, ताटे ,ग्लास, लाकडी फळे, टिव्ही,टेप,  रेडिओ,इत्यादी रजि. नुसार चेक करुन  घ्यावे. जे  हजर नाही त्याची नोंद घ्यावी.

(3) शापो योजनेचा  स्टॉक रजि. च्या शिलकीनुसार तपासुन घ्यावा.कमी असल्यास  पुर्तता करवुन घ्यावी.

(4) पुस्तके नावानिशी मोजुन घ्यावीत.शक्यतो पुस्तकाचे आयुष्य तीनएक वर्ष गृहीत  धरुन  बाकी जुनी बाद समजावीत.  व शेवटी  साहित्य  क्रमांक ....ते...पर्यंत चे सामान माझ्या ताब्यात तपासून मिळाले. असे लिहून सही करावी. चार्ज देणाराची पण सही  शेजारी  घ्यावी. जसे...

सही                                        सही                                
चार्ज देणार                  चार्ज घेणार

5) एखादे साहित्य गहाळ झाले असल्यास रजि. वर रकान्यात    संबंधिताचा  शेरा व सही घ्यावी.

6) आर्थिक अभिलेखे- कॅशबुक,पासबुक, व्हाऊचर फाईल,खतावणी,कोरी चेकबुके शेवटच्या शिलकीनुसार ठेवलेला हिशेब प्रत्येक अनुदानानुसार तपासुन घ्यावा. व साहीत्य ताब्यात मिळाल्याचे कॅशबुक वर हिशोबाच्या शेवटी पासबुक , कॅशबुक प्रमाणे ताजी शिल्लक रक्कम अंकी अक्षरी नोंदवावी व दोघांच्या सह्या कराव्यात.

(7) रजिस्टरे नं 1,,4,5  समिती इतिवृत्त,उप .भत्ता,दाखलाफाईल, पालकभेट,  पालक,मातापालक संघ शेरेबुके सालानुसार सर्व निकाल पत्रके व नोंदवह्या  ,यु डायस ,वा.शैक्षणिक. आराखडे फाईल,श्थळप्रत इत्तादी रजिस्टर्स व फाईल्स तपासून खात्री करावी  व यादीत नावापुढे फाईल्स,रजिस्टरे यांची संख्या लिहावी.शेवटी

सही                                        सही                                
चार्ज देणार                  चार्ज घेणार

अशी स्वाक्षरी करावी

(8)शिष्यवृत्ती  वाटप रजि.त्याचे कॅशबुक, चेकबुक शिल्लक तपासून घ्यावे. ताळमेळ योग्य असल्यास  शेवटच्या हिशोबा
शेवटी चार्जर देणार घेणार अशी सही  करावी
             
(9)-आर्थिक व्यवहारात  पासबुके चेकबुके,कॅशबुके प्रत्येक खर्च प्रकारानुसार तपासुन ताब्यात घ्यावीत.सध्या शाळांकडे  (1)सुवर्ण महोत्सवी  आदिवासी शिष्य.
(2) उपस्थीती भत्ता,
(3) सादील,
(4) शाळा सुधार किंवा शैक्षणिक उठाव
,(5) शा पो योजना,
(6) SSA.MPSPस्कुल
(7)   आदिवासी विद्यावेतन (इ.5 ते8)  साठी.
(8) शालार्थ खाते(' पगार) .
(9) गुणवत्ता शिष्यवृत्ती
इत्यादि खाती शाळा प्रकारानुसार  कमी जास्त  असु शकतात. त्याप्रमाणे  पाहून घ्यावीत.
- हि माहीती मी दिल्या घेतल्या चार्ज
अनुभवानुसार दिली आहे. माहितीत फरक पडू शकतो.

((चार्ज सामंजस्याने द्यावा घ्यावा))**  -

Dhyanrchnavad

⭕ ज्ञानरचनावाद⭕

⚪"पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद  म्हणतात  "⚪

🔴वैशिष्ट्ये  :--
1⃣घोकंपट्टीपासून सुटका :- आकलन करून समजुन अभ्यास करता येतो .
2⃣शाळेबाहेरचे जग आणि  शाळेतील शिकणे यांची सांगड घालता येते
3⃣अध्ययन कौशल्यांचा विकास :- श्रवण  , भाषण, वाचन , लेखन ,संभाषण , अभिव्यक्ति या कौशल्याचा विकास करणे सोपे होत.े
4⃣नविन माहिती पूर्वज्ञानाशी जुळणारी असेल तर पूर्वीच्या ज्ञानात भर पड़ते .
5⃣आंतरक्रियेमुळे ज्ञाननिर्मितीला फायदा होतो.

📕📙 पाठ शिकवताना खालील कृती अवश्य करून घ्याव्यात....
1⃣ पाठ एक दिवस आधी वाचुन येण्यास सांगा
2⃣पाठ मधील चित्र दाखवून मुलांचे गट👭👬 करून चर्चा घडवून आणा.
3⃣झालेली चर्चा प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 सांगण्याची संधी दया .
4⃣गटात चित्रावर आधारित पाच सहा ओळी माहिती लिहिण्यास 📝 सांगा
5⃣प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 माहिती वाचण्यास सांगा
6⃣पाठाचा आशय स्पष्ट करून सांगा   . चर्चा घडवून आणा .
7⃣योग्य तेथे साहित्याचा💽💻📱📻📚🎶 वापर करा .
8⃣नविन शब्दाचा वाक्यात उपयोग करून घ्या
9⃣संवादात्मक पाठ मुलांना पात्र देवून नाटयीकरणाद्वारे सादर करून घ्या .
1⃣0⃣ कविता साभिनय💃 👯सादर करून घ्या .

↪आपल्या भूमिकेत थोडा बदल करून
👉शिकणे 👈ही क्रिया अधिक मनोरंजक करू या .
आपण कमी बोलून मुलाना बोलते करून त्यांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दया .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Pc formatting

PC फॉर्मेट कसा करावा ?

आपला PC/LAPTOP सारखा प्रॉब्लम येत असेल तर फॉर्मेट करावा लागतो.तो कसा करावा यासाठी आपण खाली दिलेल्या पद्धतीने विंडोज इंस्टॉल करू शकतो.
१.डाटा बॅकअप : c ड्राइव मधे असलेला डेटा वीडियो,इमेजेस pendrive मधे बैकअप करून घ्या.
    



२. CD किंवा DVD किंवा आपण आपल्या CD / DVD चाकिंवा USB प्राधान्य प्रथम बूट साधन ड्राइव्ह करणे आवश्यक आहे USB ड्राइव्ह पासून बूट करा. आपल्या संगणकावरनिर्माते लोगो स्क्रीन दिसेल तेव्हा सेट BIOS मध्ये प्रवेश सुरूअसताना, हे करण्यासाठी. उत्पादक लोगो स्क्रीन दिसते तेव्हा आपल्या संगणकावर सुरू असताना हे सेटिंग पृष्ठ दाबा F2 दाबा, F10, F12 किंवा डेली की मध्ये प्रविष्ट करा. (विशेषतःकी स्क्रीन खाली प्रदर्शित केले जाईल



 ३ आता, BIOS मेनू मध्ये बूट मेन्यू पर्याय जा. आणि प्रथम बूटसाधन म्हणून सीडी ड्राइव्ह करून बूट साधन क्रम बदलू.तुमची प्रणाली सुरू असताना या सीडी ऐवजी हार्ड डिस्कपासून बूट करेल. आता ठराविक दिवशी (F10 दाबून आणि यामे प्रणाली प्रणाली बदलते) आपल्या आपण केलेले बदलआणि बाहेर पडा जतन करा आपल्या
संगणक रीस्टार्ट होईल.
टीप: आपण USB ड्राइव्ह पासून प्रतिष्ठापन करत असल्यास, नंतर आपण प्रथम बूट साधन प्राधान्य काढण्याची स्टोरेज सेटआहे



४    1) BIOS सेटअप पूर्ण केल्यानंतर बूट डिस्क अंतर्भूत करा व संगणक पुन्हा सुरू करा. आणि ते तुम्हाला कळत सुरूअसताना आता आपण एक संदेश दिसेल "सीडी पासून बूट करण्यासाठी कुठलिही कि दाबा ..." म्हणून कीबोर्ड आणि Windows 7 सेटअप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेकोणत्याही कळ दाबा.



५  आता आपण Windows फाइल लोड केले जाईल पाहू शकता. पूर्ण केल्यानंतर विंडोज 7 लोगो दिसेल. काहीही कॉपी किंवा अजून तुमच्या संगणकावर बदलण्यात आले आहे. आणिडेटा नंतर हटवले जाईल



६  या चरणात पसंती निवड करावी लागेल. येथे आपण पुष्टी करा आणि आपली भाषा, तुमचे वेळ क्षेत्र आणि चलन स्वरूप,आणि कीबोर्ड-इनपुट पद्धत (यूएस) निर्देशीत करण्यासाठी सूचित केले जाईल. अचूक पर्याय निवडल्यावर तुमच्या प्रणालीसाठी पुढे क्लिक करा



 ७   आता वर क्लिक करा आता स्थापित करा. आपण पुन्हा स्थापित Windows द्वारे तुमची प्रणाली दुरुस्ती जरी दुरुस्तीक्लिक करू नका. एकदा सेटअप फक्त एक मिनिटे वाटआपोआप पुढे जाईल, क्लिक



८  पुढील आणि क्लिक करा: आता ( करार आणि अटी वाचून'मी परवाना अटी स्वीकारत आहे' वर क्लिक करा



९   आता एक पडदा विचारून दिसेल 'आपण कोणत्याही प्रकारचे प्रतिष्ठापन करू इच्छिता?' स्थापित सानुकूल निवडा.
आपण विस्टा सुधारणा करू इच्छित असेल तर अपग्रेड वरक्लिक करा. विंडोज XP मध्ये 7 पासून सुधारणा शक्य नाही



 १०     एक नवीन विंडो विचारून दिसेल 'आपण Windowsस्थापित करू इच्छिता कोठे आहे?' आता "(प्रगत) ड्राइव्ह पर्याय." वर क्लिक करा हटवू, स्वरूप किंवा विभाजनेव्यवस्थापित करू शकता येथे क्लिक करा.
     आपल्या विद्यमान कार्यकारी प्रणाली विभाजन नीवडा.
आपल्या हार्ड डिस्क अनेक ड्राइव्ह असेल तर  नंतर खात्री कराआणि योग्य (साधारणपणे तो नेहमी आहे "क [विभाजन 1]"ड्राइव्ह) निवडा. विभाजन या विशिष्ट विभाजन अंतर्गतसर्वकाही हटवू स्वरुपण कारण.
आता ड्राइव्ह वर क्लिक करा आणि स्वरूप वर क्लिक करा.



 ११ या स्वरूपन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला सूचित केले जाईल.
फार प्रक्रिया पुढे क्लिक करा पूर्ण केल्यानंतर. या Windows प्रतिष्ठापन सुरू राहील. आणि ही प्रक्रिया तुमची प्रणाली गती अवलंबून 1 तास 30 मि लागू शकतो.



 १२  प्रतिष्ठापन पूर्ण केल्यानंतर आपल्या संगणक पुन्हा सुरूकरण्यात येणार आहे.



१३    ... सुरू ठेवण्यासाठी कोणतीही की 'सुरू प्रेस केल्यानंतर"पुन्हा प्रदर्शित केला जाईल. पण आपण आधीच केले कारणनाही. काही दाबू नका.
  आता फक्त एक मिनिटे वाट आणि आपल्या PC बूट सुरूआणि फक्त काही अधिक मि आत संपूर्ण प्रतिष्ठापन प्रक्रिया पूर्ण होईल.



 १४   शेवटी प्रक्रिया पूर्ण



 १५   आता आपले वापरकर्तानाव प्रविष्ट करा (हे आपल्या Windows नाव असेल)

 



१६    आणि Windows पासवर्ड विचारेल. हे वैकल्पिक आहे.



 १७  आता पुढे क्लिक करा व आपल्या Windows 7 उत्पाद कळ टाइप करा. आणि "मी ऑनलाईन करतेवेळी आपोआपविंडोज सक्रिय" पर्याय तपासा. हे सत्यापित करा म्हणजे आपण इंटरनेट कनेक्ट आपल्या Windows पुढील वेळीसक्रिय करणार नाही



 आता विंडोज अपडेट पर्याय निवडा. सुरक्षितपणे तुमची प्रणाली चालवण्यासाठी आणि स्थिरता तो आपण प्रथम दोनपर्यायांपैकी एक निवडा शिफारस केली जाते. प्रथम शोधआणि इंटरनेट वरून स्वयंचलितपणे अद्यतने स्थापित करेल.महत्वाचे सुधारणा उपलब्ध आहेत तेव्हा दुसरा पर्यायआपल्याला सूचित करेल.



पुढील विंडो मध्ये तारीख आणि वेळ सेट.



 पुढील निवडा संजाळ प्राधान्यता. साधारणपणे वापरकर्त्यांची सर्वात मुख्यपृष्ठ नेटवर्क निवडा. आपल्या नेटवर्क सार्वजनिक ठिकाणी वापरले जात आहे, तर सार्वजनिक नेटवर्क निवडा



 शेवटी! सर्व काही केले. अंतिम लोड केल्यानंतर विंडोज सुरू होईल. आणि आता आपण आपल्या PC अन्वेषण करू शकता.



Saturday, 19 December 2015

पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -

भाषा -:
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.   
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.

गणित -:
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

सामान्य विज्ञान -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.

इतिहास व ना.शास्त्र  -:
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

भूगोल -:
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏
सौजन्य- balasaheb dadge यांचा ब्लॉग.

Apl kolhapur

========Ⓜ🅰🅿=======
=======================

           🏰कोल्हापूर जिल्हा🏰

◼महाराष्ट्र राज्याचा जिल्हा

◼विभागाचे नावपुणे विभाग

◼मुख्यालयकोल्हापूर

◼तालुके

⚪आजरा,
⚪करवीर,
⚪कागल,
⚪गगनबावडा,
⚪गडहिंग्लज,
⚪चंदगड,
⚪पन्हाळा,
⚪भुदरगड,
⚪राधानगरी,
⚪शाहूवाडी,
⚪शिरोळ,
⚪हातकणंगले

🔲क्षेत्रफळ७,६८५ चौरस किमी (२,९६७ चौ. मैल)

🔲लोकसंख्या३८,७४,०१५ (२०११)

🔲साक्षरता दर८२.९०%

🔲लिंग गुणोत्तर१.०४ ♂/♀

🔲लोकसभा मतदारसंघ
◽कोल्हापूर
◽हातकणंगले

🔳कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.

🔳कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.

🔳येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत.

🔲या भागातील भरपूर नद्या आणि सुपीक जमीन यामुळे मुख्यत: शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो.

♻चतुःसीमा

🔵कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे.

🔵त्याच्या पश्चिम-नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येला रत्‍नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे.

🔵जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे.

🗻भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात.

🗻मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.

⛵जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत.

⛵या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे.

⛵कृष्णा जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरुन वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून पश्चिमेकडे वाहते.

🚀दळणवळण

🚌मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो.

🚔अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून आनुषंगिक फायदे होत आहेत.

🚚कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत.

🚍या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

🚊कोल्हापूर - मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.

🚉पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.

🗽ऐतिहासिक महत्त्व

🌐कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावले ते गाव ब्रह्मपुरी होय.

🌐इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभृत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता.

🌐कोल्हापूरच्या आसपास केलेल्या उत्खननात, तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या खुणादेखील आढळल्या आहेत.

🌐कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती.

🚩छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च, १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्‍या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला.

🏰कोल्हापूरच्या गादीचा इतिहास -

✴इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते.

✴महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला.

✴परंतु नंतर त्यांनी रायगडाकडे कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी १६९८ मध्ये सातार्‍याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली.

✴पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली.

✴राणी ताराबाईंनी पन्हाळ्यावर १७१० मध्ये स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली.

✴करवीर गादीची स्थापना करणार्‍या सरदार राणी ताराबाईंची कारकीर्द १७०० ते १७६१
अशी प्रदीर्घ होती.

✴या कालावधीत मराठी राज्यात दुही माजली होती. ताराबाई व संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांच्यामध्ये अनेक वर्षे संघर्ष चालू होता.

✴त्याचे केंद्र करवीरची गादी व कोल्हापूरचा परिसरच होता. राजारामांच्या दुसर्‍या पत्‍नीचा मुलगा दुसरा संभाजी तसेच, छत्रपती शाहू यांच्यामध्येही संघर्ष चालू होता.

✴१७३१ मध्ये याच परिसरात वारणा नदीच्या काठी शाहू व दुसरा संभाजी यांच्यामध्ये तह झाला व महाराष्ट्रातील दुर्दैवी कलहाची सांगता झाली.

✴१७८२ मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला आली.

⚡तिसरा शिवाजी यांचे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८१२ पर्यंत (५२ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द) कोल्हापूर गादीवर वर्चस्व होते.

⚡१८१८ च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. पण ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थान खालसा केले नाही, त्याचे अस्तित्त्व कायम ठेवले.

⚡पुढे १९४९ मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर स्वतंत्र होते.

🌐राजकीय संरचना

🌑लोकसभा मतदारसंघ :
🌕कोल्हापूर
🌕हातकणंगले.

🌑विधानसभा मतदारसंघ :
🌕चंदगड
🌕राधानगरी,
🌕कागल,
🌕कोल्हापूर दक्षिण,
🌕कोल्हापूर उत्तर,
🌕करवीर,
🌕शाहूवाडी,
🌕हातकणंगले,
🌕इचलकरंजी,
🌕शिरोळ.

🌑तसेच ६७ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३४ पंचायत समिती मतदारसंघ जिल्ह्यात आहेत.

🌑हवामान

🌕कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्मिम घाटातील भागांत थंड हवामान असते.

🌕जिल्ह्यात पाऊस मुख्यपणे जून ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांमुळे मिळतो, एप्रिल आणि मे महिन्यांत वळिवाचा पाऊसही पडतो. जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे.

🌑उद्योग

🌕कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत.

🌕याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम ( ज्यात मुख्यत: मोटारींचे भाग तयार केले जातात अशा फाउंड्रीज) आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत.

🌕इचलकरंजी या शहरात बरेच वस्त्रकामाशी संबंधित उद्योग आणि कारखाने आहेत.

🌕हे कारखाने तयार मालाची थेट निर्यात करतात. हुपरी हे गाव चांदीकामासाठी प्रसिद्ध आहे.

🌐सहकार व उद्योगधंदे

🎆कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. सहकारी चळवळ भारतात 

🎆महाराष्ट्रात रुजण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात (१९१२-१३) कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्था अधिनियम राजर्षी शाहू महाराजांनी लागू केला होता.

🎆तसेच सहकार तत्त्वाच्या अगदी जवळ जाणरी भिसी पद्धत किंवा पुष्टीफंड योजना १९ व्या शतकात फक्त कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात होती.

🎆भिशी पद्धत सहकारी बँकेची छोटी प्रतिकृती असून गेली २०० वर्षे जिल्ह्यात अस्तित्वात आहे.

🎆याचाच परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात हजारो सहकारी संस्था (सहकारी बँका, पतसंस्था, दूध सोसायट्या, सहकारी साखर कारखाने, शेतकी सहकारी संस्था... इ.) कार्यरत आहेत.

🎆जिल्ह्यातील अभियांत्रिकी उद्योग भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे.

🎆 जिल्ह्यातील हजारो अभियांत्रिकी कार्यशाळांमध्ये, फाऊंड्रीजमध्ये ऑईल इंजिन्स, शेतीची अवजारे, विविध यंत्रांचे सुटे भाग, तांब्याची व ॲल्युमिनियमची तार इत्यादी गोष्टी बनवल्या जातात.

🎆येथील यंत्रांची, सुट्या भागांची फिलिपाईन्स, सिरिया, इराण, घाना, इजिप्त या देशांमध्ये निर्यात केली जाते.

🌑कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संस्था गोकूळ या नावाने ओळखली जाते.

🌑या संस्थेच्या गोकूळ दुधाचा पुरवठा पूर्ण महाराष्ट्रात (प्रामुख्याने मुंबईला) केला जातो. एकूण २५०० सहकारी दूध सोसायट्या (डेअर्‍या) या संघाच्या सभासद आहेत.

🌑जिल्ह्यात वारणानगर येथे दुधाचे पदार्थ तयार करण्याचा उद्योग आहे. वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे वारणा दूध तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ मुंबई, ठाणे, पुण्यासह कर्नाटक व गोवा या राज्यातही जातात.

🌑पूर्वीपासूनच्या उसाच्या भरघोस उत्पादनामुळे जिल्ह्यातील गूळ उद्योगाला सुमारे १५० वर्षांची परंपरा आहे.

🌕येथील गूळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांतही प्रसिद्ध आहे. येथील साखरही प्रसिद्ध असून पूर्वीपासून साखरेची निर्यात केली जाते.

🌕जिल्ह्यातील कागल, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते.

🌕 त्यामुळे जिल्ह्यात विडी उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो.

🌕कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बनणार्‍या कोल्हापुरी चपला भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत.

🌕पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा मुद्दा आहेच, शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांत कोल्हापुरी चपलांची निर्यात केली जाते.

🌕कागल तालुक्यातील कापशी हे गावही या चपलांसाठी प्रसिद्ध आहे.

🌕येथील हुपरी हे गाव चांदीवरील कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे.

🌕सहकारी तत्त्वावर ऊस शेती ही पद्धत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २०० वर्षांपासून रूढ आहे. या पद्धतीस उसाची फड पद्धत असे म्हणतात. कोणताही लिखित कायदा, नियमावली, लेखी करार या गोष्टी नसतानाही केवळ शेतकर्‍याच्या परस्पर सहकार्याच्या भावनेमुळे ही पद्धत अखंडपणे चालू आहे.

🌕कोल्हापूर जिल्ह्यात भात संशोधन केंद्र (राधानगरी), फळ संशोधन केंद्र (आजरा) ही उपकेंद्रे असून ऊस संशोधन केंद्र (कोल्हापूर) हे प्रादेशिक संशोधन केंद्रही कार्यरत आहे.

🌕कृषी मालाची विक्री, कृषीविषयक आवश्यक माहितीचा प्रचार यांसाठी इंटरनेटने जोडलेले देशातील पहिले गाव म्हणजे जिल्ह्यातील वारणा हे होय.
____________________________
    🚌🚉🚌🚉🚌🚉🚌
=======Ⓜ🅰🅿========