Wednesday, 9 December 2015

Lekh

⚡आजच्या दै लोकमत मधील लेख........
सोय ‘व्यवस्थे’ची नव्हे, मुलांचीच पाहिली गेली पाहिजे!
-  डॉ. श्रुती पानसे

कोणत्याही शाळेतला शेवटचा तास
बागकामाचा असेल, नाटक- नाचाच्या सरावाचा असेल तर तो संपूच नये असं वाटतं. शाळा सुटण्याची घंटा वाजली तरी मुलांची पावलं तिथेच रेंगाळत राहतात. पण नेहमीच असतो तसा हा शेवटचा तास अभ्यासाचा असेल तर मात्र शरीराने वर्गात आणि मनाचं लक्ष घडय़ाळाकडे लागलेलं अशा अवस्थेत हा शेवटचा तास जातो. शेवटची काही मिनिटं तर मुलं केवळ कासावीस झालेली असतात, कधी एकदा शाळा सुटते या क्षणाची वाट पाहत असतात. एकदा का तो सुटकेचा क्षण आला, आणि घंटेचा टोला कानी पडला की पाठीवर दप्तर टांगून अक्षरश: घुसाघुशी करत मुलांचा मोठा लोंढा शाळेच्या दरवाज्यातून रेटत बाहेर पडतो. या रेटय़ाला एक मोठ्ठा आवाजही असतो. त्यात आनंदाच्या आरोळ्या असतात. खूप वेळ दाबून ठेवलेले शब्द असतात. मुलांना शाळेबाहेर पडण्याची प्रचंड घाई झालेली असते. बहुतांशी सर्व शाळात हीच परिस्थिती असते. 

शाळेबाहेर पडणा:या मुलांच्या चेह:यावरून, त्यांच्या देहबोलीवरून सुटकेचा आनंद लपत नाही. ही सुटका नक्की कशापासून असते? शाळेच्या वर्गापासून? शिक्षकांपासून? अभ्यासापासून की शिस्तीपासून? की या सगळ्याचाच एकत्रित आनंद झालेला असतो मुलांना? आनंदाचं उधाण आलेली हीच मुलं वर म्हटल्यानुसार काही छान छान कारणं असतील तर मात्र याच वर्गात, याच शिक्षकांबरोबर कितीही वेळ थांबायला तयार असतात. याचा अर्थ त्यांना सुटका हवी असते ती मुख्यत: अभ्यासापासून. तितकंच महत्त्वाचं म्हणजे त्यांना एक प्रकारच्या बंदिस्त रचनेपासूनही सुटका हवी असते.  

शाळांची वेळ 

कुणाच्या सोयीने?

आज शाळांच्या ज्या वेळा आहेत त्या नक्की कोणाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या आहेत? आठ तासांची शाळा म्हणजे मुलांवर ओझं असणारच. कारण त्यांना मोकळा वेळ अजिबातच मिळणार नाही.

काही शाळा दोन शिफ्टमध्ये असतात. शाळेच्या या दोन्ही शिफ्ट व्यवस्थित चालाव्यात, यानुसार शाळेच्या वेळा ठरवलेल्या असतात. यात मुलांचा विचार नसतो. शिक्षणशास्त्रत प्रत्येकाच्या जैविक चक्राचा विचार सांगितलेला आहे. प्रत्येकाच्या लर्निंग स्टाईलचाही विचार आहे. मात्र या आपल्या सिस्टीम्स या जैविक गरजांचा विचार करत नाहीत. शाळांच्या या शिफ्ट्समुळे बालवाडीतली मुलं अपुरी झोप डोळ्यांवर घेऊन येतात. रिक्षाकाका अक्षरश: या लहानग्यांना झोपेतून उचलून खाली ठेवतात. मग मुलं डोळे चोळत भानावर येतात. वर्गाकडे चालू लागतात. कित्येकदा मोठी मुलंही काही न खातापिता शाळेत येतात. पोटात काही नसताना शिकणं हे एकूणच चुकीचं आहे. कारण त्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती या सगळ्यावरच परिणाम होतो. शाळेत खिचडीचा उपक्रम सुरू करण्याचं हे महत्त्वाचं कारण होतं. कारण भुकेल्या पोटी कोणतीच बौद्धिक गोष्ट घडत नाही. आणि घडलीच तर त्यासाठी खूप जास्त मानसिक शक्ती असावी लागते. तेव्हा शाळेची वेळ ही शाळा व्यवस्थापनासाठी, पालकांसाठी नव्हे, तर मुलांसाठी सोयीची असावी.

कंटाळ्याचा संबंध मेंदूशी!

अनेक ऑफिसेसमध्ये कर्मचा:यांची काळजी घेण्यासाठी, त्यांनी रिलॅक्स व्हावं म्हणून, त्यांच्या मानसशास्त्रचा विचार करून  रिलॅक्सेशन रूम्स असतात. काही ठिकाणी चहा-कॉफी असते. प्रौढांसाठी ही सर्व व्यवस्था असते. पण ज्या शाळेत जाऊन मुलं शिक्षण घेतात, तिथे त्यांच्या रिलॅक्सेशनसाठी आपण काय व्यवस्था करतो?

मुलं शाळेत जाऊन कंटाळत नाहीत, कदाचित अभ्यास करूनही कंटाळत नाहीत. ती कंटाळतात ते एकाजागी दिवसभर बसण्याला. रोज रोज एकाच जागेवर बसायचं. तिथून मित्रंच्या पाठींवरून फळ्याकडे बघत बसायचं, या गोष्टीला ती सर्वाधिक कंटाळतात. शाळा सुटल्यावर त्यांची झालेली सुटका ही बौद्धिक असते, मानसिक असते, तशीच शारीरिक असते. त्यांना चहा, कॉफी वगैरे काहीच नको असते. पाय मोकळे करण्याची मात्र नितांत गरज असते, तेही आपल्यापेक्षा जास्त. 

 याचं कारण मेंदूशिक्षणात नमूद केलेलं आहे. हालचाल ही मेंदूची गरज आहे. डाव्या आणि उजव्या मेंदूच्या मध्यभागी कॉर्पस कलोझम हा भाग असतो. दोन्ही मेंदूचा समतोल साधण्यासाठी हा भाग सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी त्याला गरज असते ती हालचालींची. मुलांच्या दृष्टीने त्यांची शारीरिक हालचाल होणं हे फार महत्त्वाचं असतं. ही मेंदूची आग्रहाची मागणी असते. म्हणून मुलं सतत हालचाल करत असतात. चौथीपर्यंतच्या मुलांची तर अवधानकक्षाही (अटेन्शन स्पॅन) कमी असते. जसजशी मुलं मोठी होतात, साधारणपणो आठव्या वर्षाच्या आसपास कॉर्पस कलोझम विकसित होतो. त्यामुळे सततच्या हालचाली करण्याची गरज उरत नाही. यानंतर टप्प्याटप्प्याने एकाजागी जास्त वेळ बसणं शक्य होतं. अशाप्रकारे शारीरिक स्थिरता आली की एकाग्रता वाढते. म्हणून मुलांसाठी खेळ- हालचाल महत्त्वाची! शाळेत एकाजागी मुलं बसतात, ती धाकाने. जर शिक्षक वर्गात नसतील तर मुलं लगेच उधळतात. कारण त्यांना हालचाली करण्याची संधी मिळते. शरीर आणि मनाला जरा सैल वाटतं. खरं सांगायचं तर रिलॅक्स वाटतं. शाळेतली मुलं अनेक तास एका जागेवर बसतात, ते धाकाने. आणि ही गोष्ट एकूण विकासाच्या दृष्टीने काही फार चांगली नाही. 

या मुलांना जास्तीचे दोन तास मिळून अख्खे आठ तास शाळेत डांबणं म्हणजे त्यांच्या विकासाला (खरा अर्थ अभ्यासाला) मदत करणं, हा निष्कर्ष ‘व्यवस्थे’ने मुलांशी न बोलताच काढू नये, एवढं आग्रहाने सुचवावंसं वाटतं.

शेवटी शाळा मुलांसाठी असतात,

मुलं शाळेसाठी नव्हे!

 

अभ्यासाच्या अध्ये-मध्ये

मुलांच्या अंगात प्रचंड ऊर्जा असते. ती ऊर्जा मैदानी खेळ न खेळल्यामुळे, घाम येईपर्यंत भरपूर हालचाल न झाल्यामुळे वापरली जात नाही. सर्वच मुलांना अभ्यासाच्या मध्ये रिलॅक्स वाटणं  आवश्यक आहे. त्या दहा मिनिटांनंतर मुलांची एकाग्रता वाढलेली असेल. त्यासाठी अशा काही गोष्टींचा अवश्य विचार व्हावा.

 

1. केवळ श्रवणावर आधारित अभ्यास असण्यापेक्षा मुलांना बौद्धिक आव्हान मिळेल असा अभ्यास आखावा. 

 

2. अभ्यासाला कंटाळलेली मुलं ‘शैक्षणिक साधनांशी’ खेळायला कायम तयार असतात असं निरीक्षणातून लक्षात आलं आहे.

 

3. क्विझ हा प्रकार मुलांना आवडतो. त्यातून त्यांच्या मेंदूला भरपूर चालना मिळते.

 

4. शेवटचे तास मुलांना खूप कंटाळवाणो होतात हे मान्य करून त्या तासाला मुलांच्या आवडीच्या गोष्टी / आवडीचे तास ठेवणं. 

 

5. मधल्या सुट्टीशिवाय दहा मिनिटं वेगळ्या उपक्र मांसाठी राखून 

ठेवली तर ते मुलांसाठी खरं रिलॅक्सेशन असेल.

 

6. शेवटच्या सत्रतल्या दहा राखीव  मिनिटात मैदानाला एक फेरी, वर्गात दहा मिनिटाचे एरोबिक्स, एखादं गाणं सगळ्यांनी मिळून म्हणणं, झालेल्या अभ्यासावर आपापली मतं सांगण्यासाठी मुलांनी एकापाठोपाठ एक वर्गासमोर येणं असे पर्याय वापरता येतील.

 

Saturday, 5 December 2015

Imp apps

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
        ⭕काही उपयोगी अॅप्लिकेशन्स ⭕

भारतात सुमारे १६ कोटी स्मार्टफोन युजर्स आहेत. तसेच अँड्रॉइड, विंडोज अशा सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमची मिळून जवळपास तीस लाख अॅप्स उपलब्ध आहेत. सगळीच अॅप्स कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त आहेतच. त्यापैकी काही अॅप्सची ही तोंडओळख...
    
1⃣ट्रू-मेसेंजर :(अँड्रॉइड)

एखादा जंक मेल इनबॉक्समधून स्पॅम फोल्डरला कशा प्रकारे आपोआप पाठवला जातो, याची तुम्हाला कल्पना असेलच. ट्रू-मेसेंजर हे अॅप वापरले, तर हीच सुविधा एसएमएसच्या बाबतीत उपलब्ध होते. त्यासाठी सुरुवातीला तुमच्या मोबाइलवर हे अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागते. त्यानंतर फोनचे डिफॉल्ट एसएमएस अॅप म्हणून हे अॅप्लिकेशन ठेवावे लागते आणि त्यातील काही प्रकारचे एसएमएस 'स्पॅम' म्हणून 'मार्क' करावे लागतात. कालांतराने जंक मेसेज कोणते ते अॅपला आपोआपच कळेल आणि ते एसएमएस रिसिव्ह झाल्यानंतर लगेचच स्पॅम फोल्डरमध्येच जातील. तुम्ही स्वतःही हेच काम करू शकता, तसेच चुकून स्पॅममध्ये गेलेला उपयुक्त मेसेज तुमच्या इनबॉक्समध्येही पाठवू शकता. पाठवलेला मेसेज थांबवण्याची पाच सेकंदांपर्यंतची क्षमताही हे अॅप 'अनसेंड' बटणाच्या माध्यमातून देते. तसेच 'ट्रू-कॉलर'च्या टीमनेच हे अॅप बनवलेले असल्याने अज्ञात नंबरवरून आलेला मेसेज पाठवणाऱ्याचे नावही आपल्याला कळू शकते. अर्थात, त्यामुळे तुमचे नावही या अॅपच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचते, याची मनाशी खूणगाठ बांधायला हवी.
👉 सदरीलअॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी⬇ मारा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.truecaller.messenger
➖➖❌🔷🔲🔴🔲🔷❌➖➖
2⃣स्मार्टस्पेंड्स :(अँड्रॉइड)

तुमचा जमा-खर्चाचा हिशेब व्यवस्थित राखण्यासाठी शिस्तीची आवश्यकता असते. त्याकामी मदत करणारे एक अत्यंत उपयुक्त अॅप्लिकेशन म्हणजे स्मार्टस्पेंड्स. तुमच्या जमा-खर्चाचा हिशेब आपोआप राखण्याचे काम हे अॅप करते. तुमची बँक, ऑनलाइन रिटेलर्स, क्रेडिट कार्ड, व्यापारी यांच्याकडून तुमच्या मोबाइलवर येणारे मेसेज हे अॅप्लिकेशन वाचते. (म्हणजे त्यातील खर्च किंवा उत्पन्नाशी निगडीत आकडे वाचते. तुमची बँकेची कोणतीही गोपनीय माहिती किंवा पासवर्ड हे अॅप विचारत नाही.) त्या मेसेजच्या स्वरूपानुसार संबंधित रकमेचे आपोआप जमा किंवा खर्चाच्या प्रकारात वर्गीकरण केले जाते. खर्च असेल, तर तो एंटरटेन्मेंट, ग्रोसरी, बिल्स अशा वेगवेगळ्या स्वरूपात वर्गीकृत केला जातो. त्यामुळे तुम्ही आठवडाभरात किंवा महिन्यात कशासाठी किती खर्च केला, हे आपोआप तुम्हाला पाहायला मिळते. त्याचे चार्टही पाहता येतात. बिल भरण्याचे रिमाइंडर लावता येतात. तुमच्याकडे असलेल्या कोणत्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर कोठे एखादी ऑफर किंवा डिस्काउंट असेल, तर त्याचीही माहिती दिली जाते. त्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात. अर्थात यात तुम्हाला तुमच्या रिसिट फोटो काढून जोडता येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला 'वॉलनट' हे अॅप उपयोगी ठरू शकते.
👉 सदरील अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी⬇ मारा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.smartspends
➖➖❌🔷🔲🔴🔲🔷❌➖➖
3⃣इनशॉर्ट्स : (अँड्रॉइड, आयओएस)

तुम्हाला वेबसाइट किंवा वृत्तपत्रांतील बातम्या वाचणे शक्य नसेल, तर इनशॉर्ट्स हे अॅप जरूर वापरा. हे अॅप भारतीय वाचकांसाठी दखल घेण्यासारख्या बातम्या केवळ ६० किंवा त्याहून कमी शब्दांत उपलब्ध करून देते. त्यासाठी त्यांनी संपादकांची स्वतंत्र टीम नेमली आहे. नेमकी वस्तुस्थिती, घटनेचा कालावधी एवढीच माहिती वाचता येते. अधिक माहिती हवी असेल, तर पूर्ण मोठे आर्टिकलही उपलब्ध असते. नको असेल, तर पुढची बातमी वाचण्यासाठी आपण स्वाइप करू शकतो. इंग्रजी आणि हिंदी भाषांतील बातम्या येथे उपलब्ध असतात. मराठी, बांगला, गुजराती, मल्याळम, पंजाबी, ऊर्दू, इंग्रजी आणि हिंदी या भाषांतील वेगवेगळ्या स्रोतांतील बातम्या वाचण्यासाठी डेलीहंट (आधीचे न्यूजहंट) हेही अॅप चांगले आहे.
👉 सदरील अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी ⬇ मारा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.nis.app
➖➖❌🔷🔲🔴🔲🔷❌➖➖
4⃣हेप्टिक :(अँड्रॉइड, आयओएस)

हे अॅप्लिकेशन म्हणजे तुमचा जणू पर्सनल असिस्टंटच आहे. तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही या अॅपला विचारू शकता. त्यासाठी काहीही टाइप करण्याची गरज लागत नाही. तुम्हाला मुंबईहून कूर्गला कसे जायचे हे विचारायचे असेल किंवा फ्रिज दुरुस्तीसाठी स्थानिक तंत्रज्ञ शोधायचा असेल, तर यापैकी कोणतेही काम तुम्ही 'हेप्टिक'ला विचारू शकता.
👉 सदरील अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी ⬇ मारा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.haptik
➖➖❌🔷🔲🔴🔲🔷❌➖➖
   💻 शिक्षकमित्र - कुंदन माळके, धुळे 💻
           📱 9921397921 📱
➖➖❌🔷🔲🔴🔲🔷❌➖➖
5⃣टॅक्सी : (अँड्रॉइड)

तुम्ही असलेल्या ठिकाणापासून सर्वांत जवळ असलेली आणि कमीत कमी दरात उपलब्ध असलेल्या टॅक्सीची माहिती हे अॅप्लिकेशन देते. उबर, ओला कॅब्ज, टॅक्सी फॉर शुअर यांसारख्या सेवांची माहिती ट्रॅक करून तुम्हाला एकत्रित माहिती पुरवली जाते. त्यामुळे सर्वांत जवळ आणि सर्वांत स्वस्त अशा दोन कॉलममध्ये टॅक्सीची माहिती पुरवली जाते. प्रवासाला लागणारा वेळही कळतो. दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, बेंगळुरू, कोलकाता, कोची, भोपाळ, चंडीगड, सुरत अशा ५२ शहरांत हे अॅप्लिकेशन वापरता येते.             
👉 सदरील अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी ⬇ मारा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.taxis99
➖➖❌🔷🔲🔴🔲🔷❌➖➖
6⃣पिनकोड : (अँड्रॉइड)

देशांतर्गत पिनकोड, एसटीडी कोड नंबर, वाहनांचे नंबर, बँक आयएफएससी कोड, विविध कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक, पीएनआर स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्रमांक आपण या अॅप्लिकेशनच्या साह्याने शोधू शकता.
👉 सदरील अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी ⬇ मारा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.indicode.app
➖➖❌🔷🔲🔴🔲🔷❌➖➖
7⃣हेल्दीफाय मी : (अँड्रॉइड, आयओएस)

तुम्ही सेवन केलेल्या कॅलरींचा हिशेब ठेवण्याचे काम हे अॅप्लिकेशन करते. तुमची उंची, वय आणि वजनाची माहिती अॅपमध्ये भरावी लागते. त्यानंतर तुम्ही खाल्लेल्या पदार्थाचे नाव त्यात टाकले, की किती कॅलरी तुमच्या पोटात गेले, याची माहिती मिळते. तुम्हाला किती कॅलरी खाणे गरजेचे आहे, हेही त्यात दिसते. तुमची जीवनशैली आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने व्यायाम सुचवण्याचे कामही हे अॅप करते.
👉 सदरील अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी ⬇ मारा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.healthifyme.basic
➖➖❌🔷🔲🔴🔲🔷❌➖➖
8⃣रेलयात्री : (अँड्रॉइड, आयओएस)

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, तर संबंधित सर्व प्रकारची माहिती रेलयात्री या अॅपवर उपलब्ध आहे. पीएनआर स्टेटसपासून रेल्वे नकाशावर रिअल टाइम ट्रॅक करण्यापर्यंत अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. रेल्वेकडून प्रसिद्ध होणारी अधिकृत निवेदने, भारतातील रेल्वेची सगळी वेळापत्रके, बर्थ पोझिशन आणि कोच लेआउट, सीट अव्हेलॅबिलिटी, टॅक्सी किंवा फूड बुकिंग अशा अनेक सेवांची माहिती त्यात मिळते. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई यांसारख्या शहरांतील लोकल ट्रेनची माहितीही यावर उपलब्ध आहे.
👉 सदरील अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी⬇ मारा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.railyatri.in.mobile
➖➖➖🔲✖🔵✖🔲➖➖➖
                     🙏संकलन🙏
    💻 शिक्षकमित्र - कुंदन माळके, धुळे 💻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Flat khredi krtana

सदनिका (फ्लॅट) खरेदी करताना या
गोष्टींची माहिती ठेवा...
१. Carpet area - (कार्पेट एरीआ - चटई क्षेत्र) -
कार्पेट एरीआ म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी
जागा. याचा अर्थ असा की फ्लॅट मधील
जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु
शकतो ती जागा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चार
भिंतींमधील जागा ज्यावर तुम्ही गालिचा
(Carpet) पसरवू शकता.
२. Built up Area - ( बिल्ट अप एरीआ) -कार्पेट
एरीआ अधिक आतील व बाहेरील
भिंतींची जाडी म्हणजे बिल्ट अप
एरीआ. बिल्ट अप एरीआ हा साधारणपणे कार्पेट
एरीआ पेक्षा १०% ते १५% जास्त असतो.
३. Super built up / Saleable area ( SBU - सुपर बिल्ट अप
एरीआ) -बिल्ट अप एरीआ अधिक लिफ्ट, जिना
यांसाठी वापरण्यात आलेली संयुक्त जागा म्हणजे
सुपर बिल्ट अप (SBU). साधारणपणे Super built up area बिल्ट अप
एरीआच्या २५% ते ३०% जास्त असतो. सध्याचे बिल्डर्स
स्थावर मालमत्ता ४०℅ पर्यंत सुपर बिल्टअप एरीआच्या
आधारे विकतात. ( मात्र प्रत्यक्षात खरेदी करारावर कार्पेट
एरीआचीच नोंद असते.)समजा तुम्ही
बिल्डर कडून खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचा सुपर बिल्ट
अप एरीआ १००० चौरस फूट इतका असेल तर प्रत्यक्षात
वापरासाठी मिळणारा कार्पेट एरीआ ६५० ते ७००
चौरस फूट असेल.
४. Approved plans - (मान्यताप्राप्तआराखडा)स्थावर मालमत्तेचा
आराखडा हा संबंधीत महापालिकेने मंजुर केलेला असतो. यामध्ये
प्रकल्पाचा आराखडाआणि प्रत्येक फ्लॅटचा आराखडा समाविष्ट असतो.हा
एक महत्त्वाचा दस्तऐवज (Document) असुन बांधकाम
कायदेशीर रीत्या करण्यात आले असल्याचा एक
मुख्य पुरावा असतो. घर खरेदीचा निर्णय घेण्यापुर्वी
मान्यताप्राप्त आराखडा अवश्य तपासून पहावा.
५. Completion Certificate -Occupation certificate (OC)
हा एक महत्त्वाचा दाखला असतो. हा दाखला महानगरपालिकेकडून
बिल्डरला देण्यात येतो. ईमारतीमध्ये पाणी
विजपुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच
सुरुवातीस मंजुर केल्याप्रमाणे आणि मान्यताप्राप्त
आराखड्याप्रमाणेईमारतीचे बांधकाम केले असल्याचा हा दाखला
असतो. या दाखल्याद्वारे महानगरपालिकेने सदर ईमारत राहण्यायोग्य
असल्याचेजाहीर केलेले असते.फ्लॅटची
पुर्नविक्री करताना ह्या दाखल्याची आवश्यकता
बैंकेला सर्वात जास्त असते त्याशिवाय लोन सॅक्शन होत नाही
व पुढील व्यवहारात अडचणी येतात त्यामुळे हा
दाखला लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा.
६. Mortgage (गहाणखत) -गृहकर्ज पुरविणारी बँक
आणि खरेदीदार यांमध्ये झालेल्या करारानुसार
गृहकर्जाची पुर्ण परतफेड होईपर्यंत विकत घेतलेल्या घराचा
ताबा बँकेकडे ठेवला जातो. या करारास गहाणखत किंवा Mortgage deed /
Agreement असे म्हणतात.मालमत्तेची सर्व कागदपत्रे
कर्ज फिटेपर्यंत बँकेकडेच राहतात.
७. Possession letter - (मालकीपत्र)हे पत्रक
बिल्डर कडून ग्राहकास देण्यात येते. यामध्ये असे लिहिलेले असते
की मालमत्ता राहण्यासाठी पुर्णपणे तयार आहे
आणि आता ग्राहकाकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे.
Possession letter (मालकीपत्र) मिळविल्याशिवाय ग्राहकास
सदनिकेत राहण्यासाठी जातायेत नाही.
८. Registration of an agreement (करार नोंदणी) -
बिल्डर आणि ग्राहकामध्ये जागेचा/घराचा जो करार झालेला असतो
त्याची Indian registration Act खाली
नोंदणी केली जाते. नोंदणी
करण्यापुर्वी Stamp duty (मुद्रांकशुल्क) भरणे आवश्यक
असते. स्थावर मालमत्ता विकत घेताना झालेला व्यवहार व करार
यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असते.सदर
नोंदणी करण्यासाठी रजीस्ट्रेशन
चार्जेस (Registration charges) द्यावे लागतात.
९. Sales deed (खरेदीखत) -जमिनीचा मूळ
मालक/ बिल्डर यांनी ठराविक रकमेच्या मोबदल्यात मालमत्तेचा
मालकी हक्क खरेदीदाराच्यानावे
हस्तांतरीत करण्यासाठीचा जो करार केला जातो
त्यास Sales deed असे म्हणतात. Sales deed ची
नोंदणी करणे महत्त्वाचे असते.
१०. Stamp Duty - (मुद्रांक शुल्क)नोंदणीकृत
विक्री मुल्याच्या (Transaction Value) काही
टक्के रक्कम मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात सरकारला द्यावे लागतात.
ग्राहकाने Stamp duty भरलेली आहे आणि त्याच्या/ तिच्या
नावावर मालमत्तेची नोंदणी झालेली
आहे. Stamp duty विक्री मुल्याच्या५% ते १४% पर्यंत
असते. हे दर वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असतात.
घरखरेदीसाठी उपयुक्त ठरणारी
ही माहिती आपल्याला नक्कीच
आवडेल....

Thursday, 3 December 2015

मुलांचा लर्निंग पॅटर्न जाणून घेण्यासाठी फ्री मोबाईल अॅप

  💐सौजन्य - दिनेश बोधनकर , अकोला.💐

 आजच्या युगात सर्व काही स्मार्ट झालं आहे, या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य अधिक स्मार्ट व्हावा यासाठी पालक प्रयत्न करत असतात. अशाच पालकांची गरज लक्षात घेऊन मुलांच्या शिक्षणाचा पॅटर्न सांगणारे एक जबरदस्त अॅप बाजारात आले आहे. एक्समप्लक्स (exemPlux) असे या अॅपचे नाव असून त्याने पालकांना आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीने शिकवावे यासाठी मदत केली आहे. 

प्रत्येक मुलाची शिकण्याची आपली वेगळी पद्धत असते. काही जण व्हिडिओ किंवा चित्र पाहून शिकतात, त्याला व्हिज्युअल स्पेशल म्हणतात. तर काही संगीत आणि ऑडिओच्या माध्यमातून पकटन गोष्ट ध्यानात घेतात, त्यांना म्युझिकल रिदमिक आणि हार्मोनिक म्हणतात. काही मुलं अॅक्टिविटीतून शिकतात त्यांना ब़ॉडी किनिस्थॅटिक म्हणतात. 

एक्समप्लक्स (exemPlux)च्या माध्यमातून पालक आपल्या मुलाचा लर्निंग पॅटर्न जाणून घेऊ शकतात. त्यासाठी या एक्समप्लक्समध्ये ११ प्रश्न आहेत. त्याची उत्तर देण्यासाठी केवळ ३ मिनिटंच लागतात. 

प्रत्येक प्रश्न हा शास्त्रीय पद्धतीने निवडण्यात आला आहे. एक शास्त्रीय फॉर्म्युला वापरून त्याचा रिझर्ल्ट काढण्यात येतो. हा रिझर्ल्ट पालकांनी दिलेल्या उत्तराच्या आधारावर काढण्यात येतो. त्यामुळे योग्य उत्तर देऊन आपल्या मुलाचा लर्निग पॅटर्न जाणून घेता येतो. 

हे अॅप ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी उपयोगी पडणारे आहे. हे फ्री मोबाईल अॅप वापरून पालक आपल्या मुलांचा लर्निंग पॅटर्न सहज जाणून घेऊ शकतात. तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाला योग्य दिशा देऊ शकतात. 

हे फ्री मोबाईल अॅप सी ३ सोल्यूशन या मुंबईतील कंपनीने डेव्हलप केले आहे. तसेच या अॅपसाठी प्रश्नावली बॉक्स ३ लर्निंग पुणे यांनी तयार केली आहे. 

युजर्स exemPlux गुगल प्ले स्टोअरवरूनही इन्स्टॉल करू शकतात. किंवा खालील लिंकवरून डाऊनलोड करा.  https://play.google.com/store/apps/details?id=com.mac.exemplux  

         🌹महाराष्ट्र अँडमिन पँनल🌹

Friday, 20 November 2015

पुस्तकांची मेजवानी

msblc.maharashtra.gov.in
या वेब साइट ला आवश्य भेट द्या.
सदर वेबसाइट वर 444 पुस्तके उपलब्ध आहेत
कृपया त्याचा लाभ घ्यावा.

https://msblc.maharashtra.gov.in/download.html

Wednesday, 18 November 2015

🎃🎃अफलातून अॅप्स🎃🎃🎃
__________________________
मोबाइलमधली अॅप्स आपल्याला दर पावली मदत करतात. अशीच काही भन्नाट अॅप्स जी मोबाइलमध्ये जास्त जागाही खात नाहीत. शिवाय प्ले स्टोअरवर मोफत उपलब्धही आहेत.

🎯🎯ईएस फाइल एक्सप्लोअरर - या अॅपमार्फत तुम्ही फोटोज्, व्हिडिओज् आणि इतर फाइल्स सोयीस्करपणे मॅनेज करू शकता. एखाद्या फाइलचा शोध आणि त्यावरील इतर प्रक्रिया या अॅपमार्फत सहज करता येतात.

🎯🎯 बबल - आधी पेड असलेलं हे अॅप आता मोफत असून ब्राउजिंगचा वेगळा अनुभव यातून येतो. या अॅपचा वापर करुन मोबाईलच्या होम स्क्रीनवरच तुम्ही ब्राऊजिंग करू शकता. या अॅपचा वापर वेळेची बचत करतो.

🎯🎯पॉकेट - समजा तुम्हांला इंटरनेटवर एखादे आर्टीकल वाचायचे आहे पण वेळ नाही, अशावेळेस फक्त हे आर्टीकल पॉकेटमध्ये टाका आणि नंतर ऑफलाईन असताना वाचा. आर्टीकलप्रमाणेच एखादी व्हिडिओही तुम्ही पॉकेटमध्ये ठेवून ऑफलाईन पाहू शकता.

🎯🎯शेअर इट - हे डाटा शेअरिंगसाठी बेस्ट अॅप. याचा वापर एका स्मार्टफोनमधून दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये फाइल ट्रांसफर जलदगतीने करण्यासाठी होतो. पाठवणारा आणि घेणारा अशा दोघांकडे हे अॅप असणं जरुरीचं आहे.

🎯🎯 बुलेट - मोबाइलला कॉम्प्युटरशी कनेक्ट करण्यासाठी या अॅपचा उपयोग होतो. यासाठी आधी कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये पुश बुलेटचं प्लग-इन इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही मोबाईलवरील मेसेजेस्, नोटिफिकेशन आणि फाइल्स कॉम्प्युटरवरूनच मॅनेज करू शकता.

🎯🎯ड्रॉपबॉक्स - मोबाइलमधील डाटाचा बॅकअप ठेवणार हे क्लाउड स्टोरेज अॅप आहे. मोबाइलमध्ये स्पेस नसल्यास या अॅपवर रजिस्टर करुन २जीबीपर्यंत मोफतपणे डाटा स्टोअर करू शकतो. २जीबीपेक्षा जास्त डाटा स्टोअर करण्यासाठी मात्र पैसे मोजावे लागतात.

🎯🎯 टायमर - तुम्हाला झोपताना गाणी ऐकायची सवय असल्यास हे अॅप अत्यंत उपयोगी ठरेल. या अॅपमध्ये दिलेला टायमर पहिजे तसा सेट करता येतो. उदाहरणार्थ तुम्ही १० मिनिटाचा टायमर लावून गाणी ऐकताना झोपून गेलात तर हे अॅप १० मिनिटांनी गाणी बंद करतं. याचा वापर यूट्यूबसाठीसुध्दा करता येतो.

🎯🎯मीटर अॅप - गुगलने नुकतंच हे अॅप अँड्रॉइडसाठी उपलब्ध करुन दिलंय. यामध्ये दिलेल्या ३ लाईव्ह वॉलपेपर्सवर वायफाय, बॅटरी आणि नोटिफिकेशन ठेवू शकतो. एखाद्या कंपाससारखे हे अॅप काम करतं.

🎯🎯क्यू आर कोड रिडर - हे अॅप वापरून कोणत्याही वस्तुवरील क्यू आर कोड स्कॅन करुन त्याची माहिती तुम्ही मिळवू शकता. हल्ली प्रत्येक वस्तुवर हा कोड दिलेला असतो. या अॅपच्या मदतीने त्या वस्तूंची माहिती तुम्ही सहज मिळवू शकता.
- संग्रही माहिती

पुस्तक का वाचावे....?
!! वाचेल तो वाचेल !!
1- महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट म्हणजे "थाॅमस पेन" यांनी लिहिलेले "राईट्स ऑफ मॅन "नावाचे पुस्तक या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली.
2 - डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले याचे मूळ हे केळुसकर गुरूजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र हे पुस्तक आहे.
3- भगतसिंग यांना इंग्रजानी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते त्या वेळी तेथील जेलरने भगतसिंग यांना विचारले की "तुला तर उदया फाशी देण्यात येणार आहे ; मग हया पुस्तक वाचण्याचा काही उपयोग होणार नाही !! त्या वेळी भगतसिंग जेलरला म्हणाले की "माझ्या वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील ".
4- भगतसिंग यांनी तुरूंगात असताना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करून उपोषण केले होते.
5 - वाचन हा शब्द कसा तयार झाला?
वचन- म्हणजे शपथ ;
एखादे काम पूर्ण करण्यासाठी किंवा त्या मार्गावर चालण्यासाठी केलेला निर्धार शपथ चा अर्थ -
श- शतक ; 100 टक्के
पथ- मार्ग किंवा रस्ता
म्हणजे शंभर टक्के यशाकडे जाणारा मार्ग होय.
वचन चा अर्थ शपथ,
शपथ चा अर्थ यशस्वी मार्ग,
यावरून वाचन चा अर्थ हा शंभर टक्के यशस्वी मार्ग होय.
6 - बाबासाहेबानी पुस्तकासाठी राजगृह नावाचे एक घरच बांधले होते, ज्यात हजारो पुस्तक होती.
7 - अब्राहम लिंकन हा तर पुस्तकवेडा माणूस होता, एकदा तर शेजार्याकडून घेतलेले पुस्तक पावसात भिजल्याने त्या पुस्तकाची मजूरी म्हणून पुस्तक देणा-याकडे काम केले.
8 - नेपोलियन बोनापार्टने वाचलेल्या पुस्तकाची यादी आजही पॅरिसमधील वस्तुसंग्रहालयात आहे.
9 - "अवंतिका" हे एक पुस्तक असून ते लिहणारी लेखिका तिचे नाव स्नेहलता दसनूरकर आहे, तिचे ते पुस्तक मिळवण्यासाठी नंबर लावावा लागतो.
10- मराठीतील पद्मा गोळे नावाची लेखिका होत्या त्यांचा मृत्यू काही मिनिटावर असताना त्यांना उठता, बसता येत नव्हते.
त्यामुळे त्या झोपून शेवटी पुस्तकाची एक एक पाने फाडून वाचत असत व पुस्तक वाचताना मरण पावल्या.
11 - आज भारतात सर्वात संपन्न जर कोणता धर्म असेल तर तो "शीख धर्म" आहे याचे कारण काय तर शीख धर्माने ग्रंथाला गुरू मानून धर्मग्रंथाचा दर्जा दिला, तो "गुरूग्रंथसाहीब" हा धर्मग्रंथ आहे.
1 2 - लिंगायत धर्माचा धर्मग्रंथ सुद्धा "वचन साहीत्य" म्हणजे पुस्तक आहे.
बसवेश्वर यांची वचने छापील रूपात आणण्यासाठी कर्नाटकमधील हळकटटी नावाच्या माणसाने स्वतःचे घर विकून टाकले व रस्त्यावर राहायला लागला.
!! पुस्तक कोणते वाचावे?? !!
काही लोक ईश्वराला मानणारी आहेत, ती आस्तिकवादी पुस्तक वाचतात.
काही नास्तिक आहे, ती नास्तिकवादी पुस्तके वाचतात.
पण मला वाटते आपण आस्तिकवादीही वाचू नये व नास्तिक वादीही वाचू नये तर आपण वास्तववादी पुस्तके वाचली पाहीजे
1 3- कोणत्याही एका विषयाची पुस्तक जमा करून दहा वर्ष त्यावर चिंतन करा, अकराव्या वर्षी तुमची गणना एका विद्वानात केली जाईल.
14- ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर होईल भूईसपाट
15- पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते व सशक्त मस्तक कोणासमोर डोळे झाकून नतमस्तक होत नाही
16- आपण गेल्यावर लोकांनी आपणाला विसरू नये असे वाटत असेल तर दोनपैकी एक काम करा
एक लिहिण्यासारखे काहीतरी काम करा किंवा वाचण्यासारखे काहीतरी लिखाण करा...
धन्यवाद !!
आपलाच:-पुस्तकवादी  नितेश